नगर सहयाद्री टीम-
बदलत्या मोसमांमुळे अनेकदा लोक आजारी पडतात. हिवाळ्यात पडणाऱ्या गुलाबी थंडीने तर अनेक जण काकडतात. अशा परिस्थितीत थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य आहाराचे पालन करणे गरजेचे आहे. शरीर उबदार ठेवण्यासाठी गरम दूध प्यायला पाहिजे, दूधामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि कॅल्शियमसह अनेक पोषक घटक आढळतात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी सुमारे 2 ते 3 तास आधी दूध पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. रात्री झोपण्याच्या एक तास आधी दूध प्यायल्याने झोप चांगली येण्यास मदत होते.
जर तुम्ही सकाळी नाश्त्यासोबत दूध पीत असाल, तर ते तुम्हाला दिवसभर उर्जा देत राहते.थंडीच्या मोसमात काही मसाले मिसळून दूध प्यायल्यास खूप फायदा होईल.
तुम्ही दुधात हळद, दालचिनी पावडर, लवंगा आणि काळी मिरी यांसारखे मसाले समाविष्ट करू शकता. या मसाल्यांमध्ये मिसळून दूध सेवन केल्याने तुमची कमकुवत प्रतिकारशक्ती वाढते.