spot_img
देशमुकेश अंबानींना ई-मेलद्वारे 400 कोटींच्या खंडणीसह जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत, असा...

मुकेश अंबानींना ई-मेलद्वारे 400 कोटींच्या खंडणीसह जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत, असा पकडला ‘तो’ वनपारधी

spot_img

नगर सह्याद्री टीम : मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुलाला पोलिसांनी पकडले आहे. 19 वर्षीय गणेश रमेश वनपारधी असे आरोपीचे नाव आहे. त्याने मुकेश अंबानींना 400 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

तेलंगणातील रहिवासी असलेल्या वनपारधी याने 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर रोजी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दोनदा धमकी दिली होती. यामध्ये ई-मेलकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला होता.

८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनपारधी याने गेल्या काही महिन्यांपासून अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक ई-मेल पाठवले होते. ई-मेलमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गेल्या काही दिवसांत अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही तिसरी वेळ आहे.

अँटिलियाभोवती सुरक्षा वाढवण्यात आली होती
या धमक्या लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी अँटिलियाच्या आसपास आधीच सुरक्षा वाढवली होती. पोलीस माझा माग काढू शकत नाहीत किंवा अटक करू शकत नाहीत. तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरीही आमचा एक स्‍नाइपर तुम्हाला मारू शकतो अशी धमकी मेल मध्ये दिली होती. पोलिसांनी बेल्जियमस्थित ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून ई-मेल पाठवणाऱ्याची माहिती मिळवली होती. त्यानुसार कारवाई करत त्यास अटक केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे काशिनाथ दाते यांना पारनेर शहरातून...

विखे पाटलांचा थोरातांवर हल्लाबोल ; काय म्हणाले पहा…

संगमनेर / नगर सह्याद्री अनेक वर्षापासून मंत्रिपद असतानाही आपण काही करू शकलो नाही याचे शल्‍य...

केंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा…

मुंबई / नगर सह्याद्री - भाजपचा विस्तार झपाट्याने होत आहे. पीक वाढले की त्यासोबत रोगही...

शरद पवारांचा सरकारला ”दे धक्का”; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?, पवारांच्या डोक्यात नेमकं काय…

मुंबई / नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत भावनिक आणि मुद्द्यांचे राजकारण महाविकास आघाडीला फायद्याचे ठरलं...