spot_img
अहमदनगरशिर्डीतील दिंडीत अपघातग्रस्त वारकऱ्यांचा खर्च पालकमंत्री विखे पाटील करणार !

शिर्डीतील दिंडीत अपघातग्रस्त वारकऱ्यांचा खर्च पालकमंत्री विखे पाटील करणार !

spot_img

लोणी / नगर सह्याद्री : शिर्डी येथून आळंदीकडे निघालेल्या दिंडीला रविवारी अपघात झाला. यामध्ये ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला. तर यात ८ वारकरी जखमी झाले होते. या अपघातग्रस्त सर्व व्यक्तींच्या उपचारांचा खर्च महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे करणार आहेत.

मुख्यमंत्री सहायता निधीतूनही मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जखमींच्‍या उपचारांची माहीती मंत्र्यांनी डॉक्‍टरांकडून जाणून घेतली.
विश्वसंत साईबाबा पालखीला संगमनेर तालुक्यातील माउली घाटानजीक अपघात झाला. राहाता तालुक्यातील कनकुरी येथील भाऊसाहेब नाथा जपे, कोऱ्हाळे येथील ताराबाई गमे, शिर्डी येथील बबन थोरे आणि कोपरगावचे बाबासाहेब गवळी या चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला. अन्य काही जखमी वारकऱ्यांना संगमनेर येथील कुटे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

मंत्री विखे पाटील यांनी सर्व जखमी व्यक्तींवर तातडीने आवश्यक उपचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. रात्री उशिरापर्यत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरीक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर आदींसह स्थानिक अधिकारी रुग्णालयात थांबून होते. मंत्री विखे पाटील यांनीही उपचारांची माहीती डॉक्टरांकडून जाणून घेतली. उपचारांचा सर्व खर्च मंत्री विखे पाटील यांनी करण्याची जबाबदारी घेऊन जखमी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही या व्यक्तींना मदत होण्यासाठी सर्वाचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याबाबत त्यांनी प्रशासनास सूचना दिल्या असून त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान पुणे महमार्गावरून आळंदीकडे जणाऱ्या सर्व संख्या लक्षात घेवून या मार्गावर वातुकीचे नियोजन करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनास दिल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...