spot_img
ब्रेकिंगजीएस महानगर बँक निवडणूक ; १८ जागांसाठी ३८ जण रिंगणात, सासू सुना...

जीएस महानगर बँक निवडणूक ; १८ जागांसाठी ३८ जण रिंगणात, सासू सुना आमने-सामने

spot_img

गीतांजली शेळके यांच्या पॅनलची एक जागा बिनविरोध
मुबंई / नगर सह्याद्री –
जीएस महानगर बँकेच्या संचालक मंडळाच्या येत्या ०१ जून रोजी होणार्‍या निवडणुकीत गीतांजली शेळके यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजयी सुरुवात केली आहे. १९ जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीत शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून गीतांजली शेळके गटाचे संतोष रणदिवे बिनविरोध विजयी झाले. आता १८  जागांसाठी ३८ जण निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलचे एक उमेदवार बिनविरोध झाल्याने गीतांजली शेळके यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या निवडणुकीसाठी १९ जागांवर ९६ अर्ज दाखल झाले होते. अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधीपासून बिनविरोध निवडणूक घडवण्यासाठी अनेक बैठका झाल्या, परंतु लवचिकतेच्या अभावामुळे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी सुमनताई शेळके यांच्या गटाचे संचालक श्रीधर कोठावळे यांनी गीतांजली शेळके यांच्या गटात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारीही मिळाली. तसेच, सुमनताई शेळके गटाचे विकास उंद्रे आणि वर्षा जाधव यांनीही आपले अर्ज मागे घेऊन गीतांजली शेळके यांना पाठिंबा जाहीर केला. विजयी सुरुवात करत गीतांजली शेळके यांच्या गटाने उर्वरित १८ जागा जिंकून १९-० अशा फरकाने निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. आता १८ जागांसाठी ३८ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

गीतांजली शेळके यांचा दोन मतदारसंघात अर्ज
बँकेचे निवडणुकीत गीतांजली शेळके यांनी सर्वसाधारण मतदारसंघात अर्ज ठेवला असून सोबतीला महिला राखीव मतदारसंघातील त्यांनी उमेदवारी अर्ज ठेवला आहे याचाच अर्थ दोन मतदारसंघातून त्या आपली उमेदवारी आजमावत आहेत

सासू सुना आमने-सामने
जीएस महानगर बँक निवडणुकीत सुमनताई शेळके व स्मिता शेळके या मायलेकी ची उमेदवारी महिला राखीव मतदारसंघात आहे. त्यांच्या विरोधात गीतांजली शेळके यांनी देखील अर्ज ठेवला आहे.

सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलचे उमेदवार –
सर्वसाधारण मतदार संघ :  शेळके गीतांजली उदय, कवाद भास्कर बाबाजी, आडसूळ सचिन सीताराम, खोसे कुंदा भास्कर, खणकर सतीश अनंत, थोरात मंगलदास भाऊसाहेब, लंके बबन भाऊ, ढोले रवींद्र दत्तात्रय, पठारे संतोष किसन, शिंदे पांडुरंग विष्णू, गुंजाळ गणेश सावकार, कोठावळे श्रीधर कोंडिराम, खोसे मंगेश नारायण, शिंदे शंकर पांडुरंग. महिला राखीव मतदार संघ : शेळके गीतांजली उदय, वाढवणे छाया रामदास. अनुसूचित जाती/जमाती राखीव मतदार संघ : रणदिवे संतोष भाऊराव (बिनविरोध निवड).  इतर मागास वर्गीय राखीव मतदार संघ : थोरात भिवाजी भागुजी. विमुक्त व भटया जाती मतदारसंघ : पालवे विलास दगडू.

सुमनताई शेळके यांच्या पॅनलचे उमेदवार –
सर्वसाधारण मतदारसंघ ः भोसले किसनराव शंकरराव, चत्तर विजय नानाभाऊ, डेरे राजेश चंद्रकांत, ढोमे सुरेश होनाजी, हाडवळे भानुदास ज्ञानदेव, लावंड शिवाजी सदाशिव, पाटील योगेश पांडुरंग, शेळके स्मिता गुलाबराव, तांबे नंदकुमार नाथा, वरखडे बबुशा बाबुराव. महिला राखीव मतदार संघ – शेळके स्मिता गुलाबराव, शेळके सुमन गुलाबराव. इतर मागावर्गीय राखीव मतदार संघ ः कुन्हे मंगेश ज्ञानेश्वर. भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघ – गर्जे प्रविण कारभारी.

अपक्ष उमेदवार –
सर्वसाधारण मतदारसंघ ः भगत विष्णु सखाराम, घावटे राजाराम प्रभू, कावरे बबन राधाकृष्ण, खणकर परशुराम मारुती, राऊत अर्जुन किसन. इतर मागावर्गीय राखीव मतदार संघ ः खोसे खंडू मालक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात आज येलो अलर्ट! तुफान पाऊस कोसळणार

मुंबई । नगर सहयाद्री राज्यात सध्या अवकाळी पाऊस सुरु असून राज्याला येलो अलर्ट देण्यात...

लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० हजार जमा होणार? मे-जूनचा हप्ता एकत्र येणार…?, वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला...

हॉटेल चालकानी तरूणीला संपवल!, बड्या नेत्याच्या गावात ‘धक्कादायक’ प्रकार

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या तरुणीची हत्या करून मृतदेहाची...

आजचे राशी भविष्य! सोमवार ‘या’ राशींसाठी लाभदायक महादेवाची कृपा..!, तुमची रास काय?

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल,...