spot_img
अहमदनगरभाजपचा शहर जिल्हाध्यक्षपदी वर्णी!; अभय आगरकर यांनी स्पष्टच सांगून टाकले...

भाजपचा शहर जिल्हाध्यक्षपदी वर्णी!; अभय आगरकर यांनी स्पष्टच सांगून टाकले…

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री
जिल्ह्यातील भाजपच्या तीन जिल्हाध्यक्षांपैकी दक्षिणेत दिलीप भालसिंग तर उत्तरेत नितीन दिनकर नियुक्त झाले आहेत. अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदाची निवड अद्यापही प्रलंबित आहे. असे असतांना सोशल मीडियावर शनिवार सकाळपासून  भाजपाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा अ‍ॅड. अभय आगरकर यांची निवड झाल्याची यादी फिरत होती. परंतु, याबाबत अ‍ॅड. अभय आगरकर यांच्याशी संपर्क साधला असला जिल्हाध्यक्षपदाबाबत निवड झालेली नाही. तसे कोणतेही पत्र मिळालेले नाही. सोशल मीडियावर फिरणारी यादी ही तिरंगा यात्रा व अहिल्यादेवी होळकर यांच्या त्री शताब्दी महोत्सवानिमित्त होणार्‍या कार्यक्रमाची जबाबदारी असणार्‍या पदाधिकार्‍यांची नावे आहेत असे खुद्द अ‍ॅड. अभय आगरकर यांनी नगर सह्याद्रीशी बोलतांना सांगितले.

भाजपने दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग यांना तर उत्तरेच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांची पुन्हा निवड केली आहे. परंतु, अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष पदाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या पदासाठी मोठी रस्सीखेच असल्याचे बोलले जाते. शहर जिल्हाध्यक्षपदासाठी सचिन पारखी, बाबासाहेब सानप, बाबासाहेब वाकळे, धनंजय जाधव व अनिल मोहिते यांनी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली आहे.

दरम्यान शनिवार सकाळपासून सोशल मीडियावर भाजपच्या अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. अभय आगरकर यांची फेर निवड केल्याची यादी फिरत होती. तसेच आगरकर यांच्या अभिनंदनही केले जाते होते. आगरकर यांच्या अभिनंदनाने शहर भाजपमध्ये खळबळ उडाली होती. परंतु अ‍ॅड. आगरकर यांनीच एका कार्यक्रमात अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदाची निवड झाली नसल्याचे सांगितले. तसे कोणतेही पत्र आपल्याला मिळाले नसल्याचे सांगितले. तसेच सोशल मीडियावर फिरणारी यादीमध्ये तिरंगा यात्रा व अहिल्यादेवी होळकर यांच्या त्री शताब्दी महोत्सवानिमित्त होणार्‍या कार्यक्रमाची जबाबदारी असणार्‍या पदाधिकार्‍यांची नावे आहेत असे नगर सह्याद्रीशी बोलतांना सांगितले.

अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदाची निवडही लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...