दलित वस्ती सुधार योजनांतर्गत ६ कोटी ५५ लाख ५० हजार रुपये मंजुर – अमोल खताळ
संगमनेर / नगर सह्याद्री –
जिल्हा परिषद समाज कल्याण समितीच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणेसाठी महसूलमंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या सहमती नंतर अहमदनगर जिल्ह्यातील २७९ वस्त्यामधील ३३१ कामे व सदर कामांसाठी १६ कोटी ५७ लाख ५० हजार रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. संगमनेर तालुक्यातील १०५ वस्त्यामधील १२४ कामांसाठी ६ कोटी ५५ लाख ५० हजार रुपये मंजूर झाले असून त्या कामांची प्रशासकीय मान्यता आदेश नुकतेच काढण्यात आले आहे अशी माहिती संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली आहे.
दलित वस्तीवर बंदिस्त गटार, पाणी पुरवठा, मलनिस्सरण, वीज पुरवठा, गटार बांधकाम, अंतर्गत रस्ते, पोच रस्ते, पर्जन्य पाण्याचा निचरा व समाज मंदिर बांधकाम, सिमेंट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, सौर पथदिवे यासाठी हा निधी दिला जातो. जिल्हा परिषद व पंचायत समिती मुदत संपल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांनी कामे मंजूर करताना पालकमंत्री यांची सहमती घेऊन व त्यांनी सुचविलेले कामांना नुकतीच मंजुरी दिली असून पालकमंत्री विखे यांनी दलित निधी देताना भेदभाव न करता ग्रामपंचायत कोणत्या पक्षाकडे आहे हे न पाहता दलित वस्तीचा विकास झाला पाहिजे यासाठी निधी मंजूर केला आहे.
निमोण, कौठे धांदरफळ, निमगाव खु, गुंजाळवाडी, नान्नज दुमाला, चंदनापुरी, जवळे कडलग, डिग्रस, निळवंडे, मनोली, राजापूर, वडगाव पान, वेल्हाळे, आश्वी खु, ओझर बु, ओझर बु, अंभोरे, उंबरी बाळापुर, कनकापूर, कनोली, कोळेवाडी, खळी, चनेगाव, जाखुरी, झरेकाठी, दाढ खु, निमगाव जाळी, पानोडी, पिंप्री लौकी आजमपूर, मालुंजे, शेडगाव, संगमनेर खु, कौठे कमलेश्वर, खांबे, शिबलापुर, शेडगाव, सावरगाव तळ या गावांमधील वस्तीसाठी निधी मिळाला आहे.
भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ग्रामीण भागात विकास कामांसाठी वेळोवेळी निधी देऊन पालकमंत्री विखे यांनी कार्यकर्ते यांचा सन्मान केला आहे. पालकमंत्री या नात्याने त्यांनी संगमनेर तालुक्यातील सर्व गावांना निधी देऊन एक आदर्श निर्माण करून सुरु असलेली करोडो रुपयांची विकास कामे निकृष्ट होणार नाही यांची काळजी घेण्याच्या सूचना कार्यकर्ते यांना दिलेल्या आहेत. नुकतेच कडबा कुट्टी, पिठ गिरणी, लेडीज सायकल साठी १० लाख रुपये साहेबांनी मंजूर करून दिले होते. दलित वस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून दिल्याबद्दल नामदार विखे साहेबांचे भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, अध्यक्ष वैभव लांडगे, अमोल खताळ पाटील, भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व निधी मिळालेल्या गावांमधील ग्रामस्थांनी आभार मानले आहे.