spot_img
ब्रेकिंगनागरिकांमध्ये मोठी नाराजी; 'त्या' रस्त्यावर अवैध व्यवसाय करणाऱ्या महिला, कडक कारवाई होणार?

नागरिकांमध्ये मोठी नाराजी; ‘त्या’ रस्त्यावर अवैध व्यवसाय करणाऱ्या महिला, कडक कारवाई होणार?

spot_img

Maharashtra News: आळंदी पुणे रस्त्यावरील वाढते हॉटेल-लॉज आणि अवैध व्यवसाय करणाऱ्या महिला परिसरात दिसत असल्याने नागरिकांतून मोठी नाराजी आहे. अवैध व्यवसाय करत असल्याचे परिसरात आढळून आल्यास संबंधित हॉटेल, लॉजचे मालक, चालक, व्यवस्थापक तसेच या संदर्भात जे जे संबंधित दिसतील त्या सर्वावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देत कठोर कारवाईचे सूचना निर्देश पिंपरी पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ तीनचे उपायुक्त ( डीसीपी ) डॉ. शिवाजी पवार यांनी बैठकीत दिले.

आळंदी पुणे रस्त्यावरील दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लॉज व हॉटेल मालक, चालक, व्यवस्थापक यांची बैठक पिंपरी पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ तीनचे उपायुक्त ( डीसीपी ) डॉ. शिवाजी पवार यांनी घेतली. या बैठकीस दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे, पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवींद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक जाधव, अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत बैठक झाली.

या बैठकीत हद्दीतील लॉज, हॉटेल व्यावसायिक देखील उपस्थिती होते. या बैठकीत परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा खणखणीत इशारा देण्यात आला. आळंदी परिसराचे पावित्र्य जोपासण्यासाठी सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले. लॉज व हॉटेल मालक, चालक, व्यवस्थापक यांची यावेळी उपस्थिती होती. या बैठकी मुळे परिसरात हॉटेल, लॉज चालक, मालक, व्यवस्थापकाचे धाबे दणाणले असून या बैठकीची अनेकांनी धास्ती घेतली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे यांनी या बैठकीचे आयोजन करीत बैठकीत आढळून येणाऱ्या संबंधित दोषींवर किशोर कारवाई केली जाईल असे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...