spot_img
देशमोठी बातमी! मुख्यमंत्री देणार दोन दिवसांत राजीनामा'; 'भाजपने नवा 'फॉर्म्युला' तयार केला..

मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार दोन दिवसांत राजीनामा’; ‘भाजपने नवा ‘फॉर्म्युला’ तयार केला..

spot_img

Politics News: दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. जेलमधून मुक्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ही घोषणा केली .भाजपने जिथे ते निवडणूक हरतील तिथल्या मुख्यमंत्र्यांवर खोटा गुन्हा दाखल करण्याचा नवा फॉर्म्युला तयार केला असल्याचे देखील ते म्हणाले.

अद्याप कार्यवाही असलेल्या दारू घोटाळा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर केजरीवाल शुक्रवारी तिहार जेलमधून मुक्त झाले. शनिवारी त्यांनी आपल्या पत्नीसह हनुमान मंदिरात पूजा केली आणि बजरंगबलीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टी (आप) कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना संबोधित केले.

यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, मी २ दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही.’, असे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीका करताना सांगितले की, या लोकांना तुरुंगात पाठवून आम आदमी पार्टी फोडायची होती. तुरुंगात राहिल्याने माझे मनोबल वाढले आहे. तुरुंगातून एलजी यांना पत्र लिहिले. जेव्हा मी एलजी यांना पत्र लिहिले तेव्हा मला धमकी देण्यात आली. कौटुंबिक बैठक बंद करण्याच्या धमक्या देण्यात आल्या.

अरविंद केजरीवाल यांनी पुढे असेही सांगितले की, भी दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. मी आणि मनीष सिसोदिया जनतेमध्ये जाऊ. दिल्ली विधानसभा विसर्जित होणार नाही. माझ्या जागी दुसरे मुख्यमंत्री असतील., असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘भाजपने नवा फॉर्म्युला तयार केला
भाजपने आणखी एक नवा फॉर्म्युला तयार केला आहे. की जिथे जिथे ते निवडणूक हरतील तिथल्या मुख्यमंत्र्यांवर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करायचे आणि त्यांचे सरकार पाडायचे. त्यांनी सिद्धरामय्या, पिनाराई विजयन, ममता दीदी यांच्यावर गुन्हा दाखल केला. ते एका विरोधी मुख्यमंत्र्यालाही सोडत नाहीत. सर्वांवर खोटे गुन्हे दाखल करतात, तुरुंगात टाकतात आणि सरकार पाडतात.
– मुख्यमंत्री  अरविंद केजरीवाल

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...