spot_img
अहमदनगरकोतवाली पोलिसांची मोठी कामगिरी; 'त्या' चोरट्याला गुजरातमध्ये ठोकल्या बेड्या 

कोतवाली पोलिसांची मोठी कामगिरी; ‘त्या’ चोरट्याला गुजरातमध्ये ठोकल्या बेड्या 

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्स मध्ये चोरी करणाऱ्या टोळीतील फरार असलेला आरोपीला कोतवाली पोलिसांनी सुरत (गुजरात) येथून अटक केली आहे. सोनसिंग बच्चनसिंग शिकलकर उर्फ भोंड (वय १९ वर्षे, रा. रेल्वेस्टेशन, शिकलकरी वस्ती, नाशिकरोड, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांना गुजरात पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात यश आले.

सराफा बाजारातील संतोष सिताराम वर्मा यांच्या दुकानात १ ऑक्टोबर २०२३ रोजी चोरी झाली होती. दुकानातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २४ लाख ६८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी गेल्याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला होता. कोतवाली पोलिसांनी चोरी करणाऱ्या टोळीतील २ आरोपींना याआधी जेरबंद केले आहे. या गुन्ह्यातील तिसरा फरार आरोपी सोनसिंग बच्चनसिंग शिकलकर उर्फ भोंड हा सुरत येथे असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांनी आरोपीला सुरत येथून अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीतील वाट्याला आलेले अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले आहेत.

पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि विश्वास भान्सी, पोसई गजेंद्र इंगळे, पोहेकाँ तनविर शेख, पोहेकाँ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना शाहीद शेख, पोकाँ अमोल गाढे, पोकॉ संदिप थोरात, तसेच दक्षीण मोबाईल सेलचे पोकों राहुल गुंडू यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी!; ‘त्या’ यादीत आपले नाव आहे का? ते पाहा…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री;- नगर अर्बन बँकेत पाच लाखाहून अधिक रकमेच्या ठेवी अडकलेल्या ठेवीदारांना निम्मी...

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी; ‘दो दिन के अंदर…’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांना बुधवारी रात्री...

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी ‘गुरुवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...