spot_img
अहमदनगर'रामनवमी निमित्त शहरात भव्य शोभायात्रा'

‘रामनवमी निमित्त शहरात भव्य शोभायात्रा’

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
प्रभू श्रीराम नवमीनिमित्त बुधवारी सायंकाळी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मिरवणूक सुरू झाली. भगवे झेंडे घेऊन घोडेस्वार मिरवणुकीच्या अग्रभागी होते. तसेच, सजवलेल्या रथात प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीता यांची वेशभूषा परिधान करून युवक सहभागी झाले होते. दरम्यान, मिरवणुकीत सकल हिंदू समाज व हिंदू राष्ट्र सेना डीजेसह सहभागी झाले होते.

सायंकाळी बसस्थानक चौकातून मिरवणूक मार्गस्थ झाली. माळीवाडा, पाचपीर चावडी, बॉम्बे बेकरी, चांद सुलताना हायस्कूल, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रस्ता, चौपाटी कारंजा मार्गे दिल्लीगेट येथे मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणूक मार्गावर बहुतांश दुकाने बंद होती. मिरवणूक मार्गावर वाहतूक बंद केल्याने नागरिकांना पर्यायी मार्ग शोधताना कसरत करावी लागली.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणूक मार्गावर मशिदी झाकण्यात आल्या होत्या. मिरवणुकीत डीजेच्या कर्कश आवाजाने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कोणतीही वादाची घटना न घडता मिरवणूक शांततेत पार पडली.

संगमनेमध्ये भव्य मिरवणूक
श्रीरामनवमी निमित्ताने संगमनेर येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने शहरात भव्य दिव्य शोभायात्रा काढली होती. या शोभा यात्रेत विविध हिंदुत्ववादी संघटना सामिल झाल्या होत्या.या मिरवणुकीच्या अग्रभागी सनई चौघडे, पारंपरिक वाद्य ढोल ताशा पथक, भजनी मंडळ, महिलांसाठी स्वतंत्र डि.जे. व तरुणांसाठी विद्युत रोषणाई केलेला डि.जे. लावलेला होता.तामिळनाडूतल्या कोईंबतूर येथे असलेल्या शिवाच्या ११२ फूट उंच भव्य आदियोगी मुर्ती प्रतिकृती व अयोध्येतील प्रतिष्ठापना केलेल्या श्रीरामलल्ला मूर्तीची १२ फूट प्रतिकृर्ती अत्यंत सुंदरपणे ट्रेटरवर आकर्षक विद्युत रोषणाई करुण सजवलेली होती.या शोभायात्रेची सुरवात नवीन नगर रोड, बस स्थानक, छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळा, पंजाबी कॉलनी, अशोक चौक, चावडी, मेनरोड, तेलीखुंट, नेहरू चौक, चंद्रशेखर चौक येथील राम मंदिरात महाआरती होवून मिरवणुकीची सांगता झाली. या शोभायात्रेच्या मिरवणूक मार्गावर लोकानी रांगोळी काढ़ून पुष्पवृष्टीने मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत केले. यावली फटाय ांची आतिषबाजी देखी करण्यात आली. 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....