spot_img
अहमदनगरग्रामपंचायत निकाल : कर्डिले गटाला सहा ; महाविकास आघाडीला दोन, पण...

ग्रामपंचायत निकाल : कर्डिले गटाला सहा ; महाविकास आघाडीला दोन, पण…

spot_img

सुनील चोभे / नगर सह्याद्री
नगर तालुक्यात 8 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीमध्ये वडगाव गुप्ता व देऊळगाव सिद्धी येथील सत्ताधार्‍यांना सत्ता राखण्यात यश आले आले. तर अरणगाव, हिवरे झरे, मेहेकरी, हिंगणगावमध्ये सत्ता परिवर्तन झाले. बारदरी, निबोंडी या दोन ग्रामपंचायती अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. 

यातील 6 ग्रामपंचायतीवर माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले गटाने सत्ता मिळविली. तर अरणगाव (आ. लंके गट) व हिवरे झरे या दोन ग्रामपंचायतींवर नगर तालुका महाविकास आघाडीचा झेंडा फडकला. नगर तालुक्यात आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील बारदरी, निबोंडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. या दोन्ही ग्रामपंचायती कर्डिले गटाच्याच मानल्या जातात.

सहा ग्रामपंचायतींसाठी रविवारी ८५ टक्के मतदान झाले. देऊळगाव सिद्धी येथे नगर बाजार समितीचे संचाल संजय गिरवले यांच्या पत्नी जयश्री गिरवले तर जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष दादाभाऊ चितळकर व पी. एस. बोरकर गटाच्या नूतन बोरकर यांच्यात लढत झाली. या लढतील बोरकर विजयी (१५४५) झाल्या. गिरवले यांना १३३५ मते मिळाली. चितळकर-बोरकर गटाला ८ तर गिरवले गटाला तीन जागा मिळाल्या.

वडगाव गुप्ता येथे माजी सरपंच विजय शेवाळे यांच्या पत्नी सोनूबाई शिवाळे व माजी सरपंच भानुदास सातपुते यांच्या गटाच्या ऋतुजा डोंगरे यांच्यामध्ये लढत झाली. त्यात सोनूबाई शेवाळे विजयी झाल्या. सातपुते यांच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला. १५ जागांपैकी १४ जागा शेवाळे गटाला मिळाल्या. एका जागेवर अपक्ष दिलीप गव्हाणे विजयी झाले.

अरणगावमध्ये सरपंच पदासाठी सात उमेदवार रिंगणात होते. यात पोपट पुंड मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. १५ जागांपैकी १२ जागा पुंड यांच्या गटाच्या आल्या. तर तीन जागा सरपंच पदाचे उमेदवार बबन शिंदे यांच्या गटाला मिळाल्या.

मेहकरी येथे माजी सरपंच संतोष पालवे यांच्या पत्नी विद्या पालवे विरुद्ध भाग्यश्री पालवे यांच्यात लढत झाली. त्यात भाग्यश्री पालवे विजयी (१२८६) झाल्या. विद्या पालवे यांना ५५७ मते मिळाली. ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन होऊन विरोधक भूईसपाट झाले. हिवरे झरे ग्रामपंचायतीत बाजार समितीचे माजी उपसभापती भाऊसाहेब काळे सरपंच पदी विजयी झाले. त्यांना ७२० मते मिळाली. तर विरोधी काळे-काटे गटाचे सुदाम रोडे यांना ५२१ मते मिळाली.

९ जागांपैकी सरपंच भाऊसाहेब काळे यांच्या गटाला चार जागा मिळाल्या. विरोधी गटाला पाच जागा मिळाल्या. हिंगणगाव येथे माजी सरपंच पोपट ढगे यांच्या पत्नी मनीषा ढगे यांच्या विरुद्ध सेवा संस्थेचे माजी उपाध्यक्ष दिलीप सिनारे यांच्या पत्नी हिराबाई सिनारे यांच्यात लढत झाली. येथे सत्ता परिवर्तन होऊन सरपंचपदी मनिषा ढगे विजयी (८५७) झाल्या.

तर हिराबाई सिनारे यांना ८१७ मते मिळाली. सदस्यपदाच्या ९ जागांपैकी ४ जागा ढगे गटाला मिळाल्या. तर पाच जागा सिनारे यांच्या गटाला मिळाल्या. तहसीलदार संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा ग्रामपंचायतींची निवडणूक सुरळित पार पडली. पोलिस प्रशासनाच्यावतीनेे मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाकडी दांडके, कुर्‍हाडी घेत दोन गट भिडले! लहान मुलांच्या वादात असे काय घडले? नगर तालुक्यातील प्रकार..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील खंडाळा गावच्या शिवारात लहान मुलांच्या वादातून दोन गटांत...

“पवार साहेब हो बोलले नंतरच राजकीय भूमिका…”; अजित पवार यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Politics News: राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली...

जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आडकला जाळ्यात; नेमकं प्रकरण काय?

अहमदनगर । नगर सहयाद्री बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचार्‍याला...

बाप-लेकाच्या नात्याचा भयानक शेवट! जन्मदात्या मुलाने बापाला एका क्षणात संपवलं..

Ahmednagar Crime: कटूंबामध्ये वाद होणं ही काही नवीन बाब नाही. परिवारात किरकोळ कारणावरून नेहमीच...