spot_img
अहमदनगरग्रामीण भागाच्या विकासाला सरकारचे पाठबळ : मंत्री राधाकृष्ण विखे

ग्रामीण भागाच्या विकासाला सरकारचे पाठबळ : मंत्री राधाकृष्ण विखे

spot_img

लोणी / नगर सहयाद्री : ग्रामीण भागाच्या विकासाला केंद्र आणि राज्य सरकारचे मोठे पाठबळ मिळत आहे. गावांच्या प्रगती बरोबरच समाजातील शेवटच्या घटकाला योजनांच्या रुपाने मोठा लाभ होत आहे.

ग्रामपंचायतीचे सदस्य या नात्याने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी गावांमध्ये करा, निधीची कमतरता नाही, काम करण्याची फत इच्छा शती ठेवा. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच नरेंद्र मोदी २०२४ ला पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील असा विश्वास महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यत केला.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील राहाता, श्रीरामपूर, राहुरी आणि संगमनेर तालुयातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. भारतीय जनता पक्षाच्या उत्तर नगर जिल्हा कार्यकारणीतील नवीन पदाधिका-यांनाही या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास चेअरमन कैलास तांबे, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, आण्णासाहेब भोसले, सतिष ससाणे, मच्छिंद्र थेटे, नितीन दिनकर, नितीन कापसे, अशोक पवार, भाजपाचे सचिन शिंदे, श्रीराम गणपुले, दीपक पठारे, बाळासाहेब गाडेकर, योगेश बनकर, भाजपाच्या महिला अध्यक्ष कांचनताई मांढरे, गिता थेटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूकीत संपूर्ण राज्यात महायुतीला जनतेने पाठबळ दिले आहे. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक प्रथम क्रमाकांच्या जागा मिळविल्या आहेत. पक्षाला आणि सरकारला ग्रामीण भागातील दिलेले पाठबळ हे महत्वपूर्ण आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास प्रक्रीयेवर लोकांनी विश्वास दाखविल्याचा उल्लेख करुन, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या योजनांच्या कामाला मिळालेले हे पाठबळ असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाची विकास प्रक्रीया वेगाने पुढे जात आहे. जलजीवन मिशन पासून ते देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची योजना प्रभावीपणे सुरु आहे. योजनांच्या रुपाने सरकारची धोरणं लोकांपर्यंत जात आहेत. भविष्यातही या योजनांचा लाभ ग्रामपंचायतींचे सदस्य या नात्यांने तुम्हाला लोकांपर्यंत पाहोचवायच्या आहेत असे ते म्हणाले.

याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, नितीन दिनकर, कांचनताई मांढरे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी आपली मनोगत व्यत केली. या कार्यक्रमास सर्व तालुयातील कार्यकर्ते, विविध संस्थाचे पदाधिकारी, आधिकारी उपस्थित होते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांच्या प्रगतीत सहकारी बँकांची भूमिका मोलाची; सुमनताई शेळके

जीएस महानगर को-ऑप. बँकेचा पुणे, सातारा, अहिल्यानगरमध्ये शाखा विस्तार पारनेर । नगर सहयाद्री:- सर्वसामान्य माणसांच्या...

तलाठ्याने जीवन संपवलं, शेवटची इच्छा व्हॉट्सॲपवर केली व्यक्त, सगळेच हादरले

Maharashtra Crime News: एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. तहसील कार्यालयात...

मोठी बातमी! वाल्मिक अण्णा कराडवर हल्ला; कारागृहात काय घडलं?

Walmik Karad: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि खंडणी प्रकरणातील आरोपी...

भाजपच्या ‘बड्या’ नेत्याला धक्का; एकुलत्या एक मुलीने जीवन संपवलं

Today News: राजकीय वर्तुळातून अलीकडच्या काळात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना, आता एक...