spot_img
देशगुड न्यूज! ४८ तासांत केरळात मान्सूनचे आगमन होणार ;'या' भागात कधी कोसळणार...

गुड न्यूज! ४८ तासांत केरळात मान्सूनचे आगमन होणार ;’या’ भागात कधी कोसळणार पाऊस?

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
मे महिन्याच्या सुरुवातीपासून सूर्य आग ओकत आहे. उष्षणतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे. त्यातच आता हवामान विभागाची मान्सून संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मौसमी वाऱ्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. अंदमान-निकोबारमध्ये दाखल झालेला मान्सून आता हळूहळू पुढे सरकरत आहे. येत्या ४८ तासांत मान्सूनचे केरळात आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्र आणि मालदीवपर्यंत पोहोचले आहेत. अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालीय. यानुसार मान्सून केरळमध्ये वेळेपूर्वी पोहोचणे अपेक्षित आहे. मान्सून दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवमार्गे लक्षद्वीपमार्गे केरळमध्ये धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी मान्सून केरळात दाखल होईल. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत ११ ते १२ जूनच्या सुमारास मान्सून दाखल होऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

मुंबईसह उपनगर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बुधवारी आणि गुरुवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...