मुंबई |नगर सहयाद्री-
LPG Cylinder Price: नागरिकांसाठी वर्षा अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे, देशातील प्रमुख गॅस कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घसरण केली आहे.
१९ किलोंच्या सिलेंडरच्या ग्राहकांना हा ४० रुपयांचा नफा मिळणार आहे. हा दिलासा सर्वसामान्यांना नसून दुकानदार व हॉटेल चालकांना देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे.सरकारी तेल विपणन कंपन्यांनी LPG सिलेंडरची किंमत ३९.५० रुपयांनी कमी केली आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली असली असून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ९०२.५ रुपये आहे.