spot_img
ब्रेकिंगमहिलांसाठी खुशखबर! 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने' चे पैसे 'या' दिवशी खात्यात...

महिलांसाठी खुशखबर! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ चे पैसे ‘या’ दिवशी खात्यात होणार जमा

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री:-
राज्य सरकारने घोषणा केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना राज्य सरकार महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. तसेच अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार, याचे वेध लागले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची १ जुलैपासून अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. परंतु अजूनही अर्ज भरण्याचीच प्रक्रिया सुरु असल्याने योजनेचे पैसे कधी मिळणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची मुदत १५ जुलै होती. सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. १ ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे १४ ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मान्सूनची पुन्हा गर्जना; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon:वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...