spot_img
महाराष्ट्रलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

spot_img

नाशिक । नगर सहयाद्री:-
राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अडीच कोटी महिलांना आता ₹1500 अनुदानासोबतच ‘रुपे कार्ड’ देखील वितरित करण्यात येणार आहे, अशी घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. या कार्डाचा वापर क्रेडिट कार्डप्रमाणे करता येणार असून, काही ठिकाणी वापरावर बंदी राहणार आहे.

महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे झालेल्या जिल्हा परिषद आयोजित कार्यक्रमात मंत्री तटकरे बोलत होत्या. बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून हे ‘रुपे कार्ड’ महिलांना वितरित करण्यात येणार आहे. या कार्डाचा वापर केवळ गरजेच्या आणि नियमबद्ध ठिकाणी करता येईल. मद्य दुकानं आणि पानटपऱ्यांवर या कार्डाचा वापर करता येणार नाही. या कार्यक्रमात महिलांसाठीच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत महिलांना ई-पिंक रिक्षाचे वितरण करण्यात आले. मंत्री तटकरे यांनी जाहीर केले की, लवकरच नाशिक शहरातील विमानतळावर पिंक रिक्षाची सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. या उपक्रमामुळे महिलांच्या उपजीविकेला हातभार लागणार आहे. या कार्यक्रमात छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर आणि महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. राज्य सरकार महिला सबलीकरणाच्या दिशेने सातत्याने काम करत असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...