spot_img
ब्रेकिंगलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! 'इतक्या' तासांत १५०० रुपये जमा होणार?

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ‘इतक्या’ तासांत १५०० रुपये जमा होणार?

spot_img

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. दरम्यान, एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख समोर आलेली नाही. परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत्या ७२ तासांत महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

लाडकी बहीण योजनेत एप्रिल महिन्याच्या अखेरपपर्यंत हप्ता जमा केला जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली होती. आता एप्रिल महिना संपायला फक्त ३ दिवस उरले आहेत. त्यामुळे येत्या ७२ तासांत कधीही लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना आनंद झाला आहे.

लाडकी बहीण योजनेत ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतात त्यांना लाभ मिळणार नाही. दरम्यान, ज्या योजनांमध्ये महिलांना १५०० पेक्षा कमी रक्कम दिली जाते त्यामध्ये उर्वरीत रक्कम ही लाडकी बहीण योजनेद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेत महिलांना १००० रुपयांचा लाभ मिळतो. त्यामुळे उरलेले ५०० रुपये हे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिले जाणार आहेत.

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. या पडताळणीमध्ये ज्या महिला पात्र नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जात आहेत. या महिलांना एकही रुपया मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत सध्या महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे. याआधी इतर निकषांची पडताळणी केलेली आहे. त्यामुळे ज्या महिला नियमांमध्ये बसत नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत. याआधीच काही महिलांना पैसे मिळणे बंद झाले आहेत. त्यानंतर अजून काही महिलांना पैसे मिळणार नाहीत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाविकांसाठी खुशखबर.! चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू...

पत्नीच्या डोक्यात घातला शॉकॉबसर; प्रेमविवाहाला कुणाची नजर लागली?, वाचा सविस्तर

Maharashtra Crime: विभक्त पत्नीवर खुनी हल्ला करणाऱ्या अमरसिंग मारुती शिंदे (वय ३७, रा. इस्लामपूर)...

अहिल्यानगर जिल्ह्यात काविळीचं थैमान; २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू

अकोले | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळ आजाराने थैमान घातले...

वीज चोरी भोवली; तिघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भिंगार हद्दीत वीज वितरण कंपनीच्या परवानगीशिवाय थेट वीज वापरून अनधिकृत...