spot_img
ब्रेकिंग‘गोल्डन कॅफे’मध्ये काळा कारभार!; पडद्याआड काय गवसलं?

‘गोल्डन कॅफे’मध्ये काळा कारभार!; पडद्याआड काय गवसलं?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील बालिकाश्रम रस्ता परिसरात चालवल्या जात असलेल्या ‘गोल्डन कॅफे’मध्ये अश्लील चाळ्यांचे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत कॅफेचा मालक ओंकार कैलास ताठे (वय 24, रा. ताठे मळा, पपिंग स्टेशन रस्ता, बालिकाश्रम रस्ता, अहिल्यानगर) याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129, 131 (क) (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कॅफेमध्ये प्लायवुडचे कंपार्टमेंट करून, त्यास पडदे लावून, शाळा-कॉलेजातील मुला-मुलींना अश्लील चाळ्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश बी. पाटील, अंमलदार सुनील शिरसाठ, सतिष त्रिभुवन, छाया गायकवाड आणि दोन पंचांसह पथकाने शनिवारी (26 एप्रिल) दुपारी 1.25 वाजता सदर ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान, काउंटरवर उपस्थित असलेला ओंकार ताठे याने स्वत: कॅफेचा मालक असल्याचे सांगितले.

तपासणी दरम्यान कॅफेच्या आतमध्ये सहा बाय तीन फूट लांब व रूंद अशा टिनच्या पत्र्याचे कंपार्टमेंट बनवले होते आणि बाहेरून पडदे लावण्यात आले होते. आतमध्ये सोफे बसवण्यात आले होते, परंतु कॉफी शॉपचा कोणताही परवाना अथवा कॉफी बनवण्याचे साहित्य आढळून आले नाही. पोलिसांनी घटनास्थळी आढळलेल्या युवक-युवतींना समज देऊन सोडले असून, सदर ठिकाणी लावलेले पडदे काढून टाकण्यात आले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...