spot_img
ब्रेकिंगBreaking: नगरकरांना खुशखबर!! खासदार विखे यांचा पाठपुरावा, ६० कोटींचे विकासकामे मंजूर

Breaking: नगरकरांना खुशखबर!! खासदार विखे यांचा पाठपुरावा, ६० कोटींचे विकासकामे मंजूर

spot_img

नगर। नगर सहयाद्री
केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत पारनेर तालुयासाठी १७ कोटी, नगर तालुयासाठी २३ कोटी आणि श्रीगोंदा तालुयासाठी ६० कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत पारनेर, श्रीगोंदा आणि नगर तालुयाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

याबाबत माहिती देताना खासदार विखे पाटील म्हणाले, हे यश माझ्यासह आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आहे. या सर्वांसमवेत केलेल्या पाठपुराव्यामुळे हा भरीव निधी मंजूर झाला. यामध्ये श्रीगोंदा तालुयातील रस्ते विकासासाठी आमदार बबनराव पाचपुते आणि माझ्या प्रयत्नांतून ६० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून काष्टी-खरातवाडी-पेडगावर रस्ता प्रजिमा- ६४ (गौते वस्ती-पेडगाव) आणि चिंबळा-वांगदरी-काष्टी-शिपळकरवाडी कौठा प्रजिमा- ०३ ते अजनुज खरातवाडी रस्ता प्रजिमा- २३७ (वांगदरी-काष्टी) या रस्त्यांचे काम होणार आहे.

नगर तालुयातील रस्ते विकासासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आणि माझ्या प्रयत्नांतून २३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीपैकी निंबळक-चास-खंडाळा-वाळुंज-नारायणडोह-पिंपळगाव उज्जैनी-पोखर्डी रस्ता प्रजिमा- १ (कापूरवाडी-पोखर्डी) यासाठी १५ कोटी रुपये, टाकळी काझी-भातोडी ते बीड रस्ता प्ररामा- १६ (टाकळी काझी-भातोडी-मदडगाव हद्द) करिता ०८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

पारनेर तालुयातील रस्ते विकासासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माझ्या प्रयत्नांतून १७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून रामा ६९ ते वडनेर हवेली-राळेगण सिद्धी रोड प्रजिमा- २१८ रस्ता (वडनेर हवेली ते गटेवाडी) करिता १० कोटी रुपये, राहाता-लोहारे-मांडवे- पारनेर-श्रीगोंदा रस्ता रामा- ६७ (कुंभारवाडी -सोबळेवाडी, पारनेर, पानोली-राळेगण सिद्धी) साठी ०७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या रस्त्यांचे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले. या रस्त्यांना गती मिळाल्याने निश्चितच जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असून जनतेच्या हितासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही अखंड कार्यरत राहू, असे खासदार विखे म्हणाले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...