spot_img
राजकारणउदयनराजेंसाठी सातारा देतो, पण... ! अजित पवारांनी या जागेच्या बदल्यात केली 'ती'...

उदयनराजेंसाठी सातारा देतो, पण… ! अजित पवारांनी या जागेच्या बदल्यात केली ‘ती’ मागणी, शिंदे-फडणवीसांची अडचण वाढली

spot_img

मुंबई / नगर सहयाद्री : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या महायुतीचे जागावाटप सुरु आहे परंतु या जागावाटपाचा तिढा मात्र सुटत नसल्याचे चित्र आहे. मित्रपक्षांचं समाधान करण्यासाठी आणि आपल्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी राजकीय पक्षांकडून जागांची बदलाबदल सुरू असल्याचं चित्र आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाबाबतही असंच होण्याची शक्यता आहे. मागील लोकसभा निवडणुकीत या जागेवरून राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. श्रीनिवास पाटील सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असले तरी या जागेवर आमचा हक्क असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीच्या जागावाटपात या जागेवर दावा सांगितला आहे. मात्र भाजपही उदयनराजेंसाठी ही जागा सुटावी यासाठी आग्रही असून साताऱ्याच्या बदल्यात अजित पवारांना उत्तर महाराष्ट्रातील जागा सोडली जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

आमची हक्काची साताऱ्याची जागा तुम्हाला हवी असेल तर आम्हाला नाशिकची जागा द्या, अशी मागणी अजित पवारांच्या पक्षाने केल्याचे समजते. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे हेमंत गोडसे हे मागील दोन टर्मपासून खासदार आहेत. मात्र या लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार असल्याने भाजपकडूनही नाशिकच्या जागेवर दावा सांगितला जात आहे. नाशिकवरून आधीच शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीनेही या जागेची मागणी केल्याने महायुतीतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

..म्हणुन बीडमधील परिस्थिती खराब; शरद पवार यांनी साधला धनंजय मुंंडेंवर निशाणा!

Politics News: बीडमधील सध्याची परिस्थिती आणि तेथील वाढत्या गुन्हेगारीवरून शरद पवार यांनी तेथील राजकारण्यांवर...

धक्कादायक! विवाहितेवर अत्याचार करत ‘तसले’ व्हिडीओ पतीला पाठविले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर शहरातून एक मानवतेला काळिमा फसवणारी घटना उघडकीस आली आहे....

शिष्टमंडळाने मांडले जनतेचे ‘ते’ प्रश्न; आमदार दातेंनी दिली पूर्ण करण्याची ग्वाही!

पारनेर । नगर सहयाद्री:- शिष्टमंडळानी केलेल्या मागण्यासाठी लवकरच पाठपुरावा करून विकास कामांसाठी निधी मंजूर...

द्राक्षाचा गोडवा वाढला! कीलोला किती रुपयांचा दर?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव,घारगाव ,कोळगाव, वडळी, आढळगाव, कोकणगाव, हिरडगाव, बेलवंडी कोठार,...