अहिल्यानगर । नघतर सहयाद्री:-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्याचा ८६.३४ टक्के लागला आहे.
फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये झालेल्या बारावीच्या परिक्षेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल 86.34 टक्के लागला आहे. बारावीच्या परिक्षेसाठी 61 हजार 455 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 60 हजार 931 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यापैकी 52 हजार 609 विद्याथ उतण झाले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात मुलांचा निकाल 81.40 टक्के तर मुलींचा 92.51 टक्के लागला आहे. पुणे विभागात पुणे पहिल्या तर अहिल्यानगर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा 94.59, कला शाखेचा 64.72 तर वाणिज्य शाखेचा 86.27 टक्के निकाल लागला आहे.
मुलींचा निकाल – ९२.५१ टक्के
मुलांचा निकाल – ८१.४० टक्के