मुंबई । नगर सहयाद्री:
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी काल त्याच्या साताऱ्यातील दरे गावात विश्रांती घेतली. यावरूनच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची’, अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला.
संजय राऊत म्हणाले, ‘ते आजारी आहेत त्यांच्याविषयी तुम्ही काही आता वेड्यावाकडे बोलू नका. त्यांची प्रकृती नाजूक आहे तुम्ही बघितला ना हाताला पट्टी लावून बसले आहेत. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले पण त्यांच्या मंत्र्यांना देखील भेटायला दिलं नाही.
तसंच, ‘अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला असं डिस्टर्ब करू नका पाच तारीखला ते येत आहेत का शपथविधीला? का एअर ॲम्बुलन्समधून त्यांना यावं लागेल? अशा चिंतेत अनेक लोक आहेत. त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असे मी वृत्तपत्रात वाचलं.
पण त्यांना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकांची गरज आहे. त्यांना बरं करण्यासाठी हा मांत्रिक अमित शहा पाठवत आहेत की नरेंद्र मोदी पाठवत आहेत. ‘एकनाथ शिंदेंच्या अंगात भूत संचराला आहे तो उतरायला पाहिजे. ते काम जर देवेंद्र फडणवीस करत असतील तर ती आनंदाची गोष्ट आहे.’अशा शब्दात संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.