spot_img
अहमदनगरपारनेर शहरातील कचरा संकलन ठप्प! नेमकं कारण काय?

पारनेर शहरातील कचरा संकलन ठप्प! नेमकं कारण काय?

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री
शहरातील कचरा संकलन ठप्प झाले आहे. पारनेर शहरात दररोज स्वच्छता करणे व घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे हे काम चार-पाच दिवस पासून ठेकेदाराने बंद केले आहे त्यामुळे पारनेर शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. दरम्यान या प्रकरणी नगरपंचायतीने ठेकेदाराला नोटीस काढली आहे.

पारनेर शहरात दररोज स्वच्छता करणे, घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे आणि कचरा डेपो मध्ये कचरा नेऊन त्यावर प्रक्रिया करणे आदी साठी पुणे येथील कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले होते. मात्र गेल्या चार पाच दिवस पासून या ठेकेदाराने अचानक स्वच्छता करणे व कचरा संकलन करणे बंद केले.

कचरा संकलन वाहनं येत नसल्याने शहरातील अनेक प्रभागांमधून नगरपंचायत कडे कचरा संकलन वाहनं येत नसल्या बाबत तक्रारी येत होत्या.महीलांची मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे.

तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न
नगरपंचायत ने पाठवले कर्मचारी गेल्या चार पाच दिवस पासून कचरा संकलन बंद असल्याने महीलांच्या व नगरसेवकांच्या तक्रारी वाढु लागले नंतर नगराध्यक्ष नितीन अडसूळ व मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी नगरपंचायतची वाहने व कर्मचारी यांना पाठवून कचरा संकलन सुरू ठेवले आहे.

नगरपंचायतीकडुंन ठेकेदाराला नोटीस
पारनेर शहरातील कचरा संकलन व स्वच्छता चे काम पुणे येथील कंपनी ला देण्यात आले होते. मात्र त्यांनी अचानक काम बंद केले मुळे त्यांना नोटीस बजावली आहे.
विनय शिपाई, ( मुख्याधिकारी, पारनेर नगरपंचायत)

नगरपंचायत पदाधिकारी व नगरसेवकांची कचरा मिलीभगत?
पारनेर नगरपंचायती अंतर्गत येणार्‍या शहर व वाड्यावर कचरा संकलनासाठी पुणे येथील ठेकेदाराला ठेका देण्यात आले असून याठिकाणी या ठेकेदाराने पारनेर येथील सब ठेकेदार नेमले असल्याची माहिती समजली आहे. शहरास वाडेवस्त्यावरील अनेक भागात कचरा हस्तव्यस्त पडलेला असून दैनंदिन संकलन व स्वच्छता केली जात नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी व रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे नगरपंचायत पदाधिकारी व नगरसेवकांची कचरा ठेकेदाराबरोबर मिली भगत तर नाही ना असा सवाल आता पारनेर शहरवासीय करू लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...