spot_img
अहमदनगरडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू..! 'त्या'आरोग्य केंद्रात नेमकं घडलं काय?

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू..! ‘त्या’आरोग्य केंद्रात नेमकं घडलं काय?

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री
तालुक्यातील काष्टी येथील आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारी याच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला असून संबधीतांवर वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी संबंधित संतप्त नातेवाईकांनी केली आहे.

अधीक माहिती अशी: २८ मार्च २०२४ रोजी गरोदर महिला निकिता नितीन माने यांना वेदना होत असल्यामुळे पती नितीन माने यांनी घराजवळच असणार्या काष्टी आरोग्य केंद्रात निकिताला सकाळी ११ वाजता प्रसुतीसाठी दाखल केले. दिवसभर त्यांना खुप त्रास झाला तरी आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. शेवटी रात्री आठ वाजता निकिताची प्रसुती झाली.

तेव्हा येथील कर्मचार्यांनी बाळाला पुढील उपचारासाठी दौंड जि. पुणे येथे पाठवले परंतु येथे गेल्यावर डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. काष्टी आरोग्य केंद्राची जबाबदारी डॉक्टरांची असताना मग डॉक्टर असुन सुद्धा डिलेवरी कर्मचार्यांनी का केली? असा संतप्त सवाल नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टर आणि आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्या दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्याने नेमका बाळाचा मृत्यू कशामुळे झाला कोणालाही सांगता येईना.

परंतु आरोग्य केंद्रात डॉक्टराची चोवीस तास सेवा देण्याची भूमिका असतांना आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा का केला? यामुळे संबंधित डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर वरिष्ठांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी माने कुटुंबातील सदस्यांनी केली आहे. मयत बाळाची आई आता खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. तिची प्रकृती चांगली नाही. पहिलीच प्रसूती आणि घरात येणारी लक्ष्मी गेल्याने नातेवाईकाना मोठा धक्का बसला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...