spot_img
अहमदनगरAhmednagar Politics : कालव्यातून निळवंडेचे पाणी आल्याने स्वप्नपूर्ती : आ. थोरात

Ahmednagar Politics : कालव्यातून निळवंडेचे पाणी आल्याने स्वप्नपूर्ती : आ. थोरात

spot_img

संगमनेर / नगर सह्याद्री : स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाचे स्वप्न पाहिले. हे धरण व कालव्यांच्या पूर्ततेसाठी आपण सातत्याने काम केले. त्यामुळे डाव्या व आता उजव्या कालव्यातून तालुक्यात पाणी आल्याने आपली स्वप्नपूर्ती झाली असून जनता सातत्याने पाठीशी उभी राहिली असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

जाणता राजा मैदान येथे शिवपुत्र संभाजी या नाटकाच्या वेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, संगमनेर तालुक्यातील आणि अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. थोरात म्हणाले, संगमनेर तालुका हा दुष्काळी तालुका आहे. परंतु या तालुक्याला पाणी मिळावे याकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाचे स्वप्न पाहिले. 1999 ला राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला गती दिली. अनेक अडचणीतून मार्ग काढून हे धरण पूर्ण केले. 2012 मध्ये धरण पूर्ण झाल्यानंतर निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी थेट पाईपलाईन योजना आणली. आणि त्यामुळे शहरवासीयांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे असे ते म्हणाले.

जाणता राजा मैदानावर तारांगण
आमदार थोरात यांचे व्यासपीठावर आगमन होताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी उपस्थित सर्व तरुणाई व नागरिकांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च ऑन करून सर्वत्र तारांगण निर्माण केले. हा अभूतपूर्व सोहळा लोकप्रिय ठरला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...