spot_img
अहमदनगरब्रेकिंग : पारनेरमध्ये आघाडीत बिघाडी; संदेश कार्ले यांनी थोपटले दंड, काय म्हणाले...

ब्रेकिंग : पारनेरमध्ये आघाडीत बिघाडी; संदेश कार्ले यांनी थोपटले दंड, काय म्हणाले पहा….

spot_img

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अपक्ष लढणार : शिवसेनेच्या अस्तित्वासाठी महाआघाडीत बिघाडी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
पारनेर नगर मतदार संघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवारीतून वगळण्यात आले. श्रीगोंदा मतदार संघात नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली तसेच नगर शहरातूनही उमेदवारी बाबत शक्यता मावळली आहे. यामुळे शिवसैनिकांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. हेच अस्तीत्व टिकवण्यासाठी पारनेर नगर मतदार संघातून पक्षाचे तिकिट मिळाले नाही तर अपक्ष उमेदवारी करणारच असे स्पष्ट करीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी बंडाचा झेंडा फडकवला.

पारनेर-नगर विधानसभा मतदार संघात आज गुरूवारी अहिल्यानगर तालुक्यातील शिवसैनिकांची विचार बैठक निमगाव वाघा (ता. अहिल्यानगर) येथे आयोजीत करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पंचायत समिती माजी सभापती प्रविण कोकाटे, माजी सभापती रामदास भोर, पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, माजी जिल्हा परीषद सदस्य शरद झोडगे, माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, संदिप गुंड, विश्वास जाधव, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, युवा सेना अध्यक्ष प्रविण गोरे, पोपट निमसे, व्हि. डि. काळे, गुलाब शिंदे, रा.वि.शिंदे, प्रकाश कुलट, सोमनाथ कांडके, ज्ञानेश्वर बर्वे, अरुण फलके, अनिल डोंगरे, भात फलके, अरुण कापसे, मिठू कुलट, बाळासाहेब ढगे, साहेबराव बोडखे, मच्छिंद्र बेरड सह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कार्ले म्हणाले खा. निलेश लंके यांना आमदार खासदार करण्यात शिवसेनेचा मोठा वाटा असतानाही त्यांनी शिवसेनेला अमेदवारी मिळवून देण्यासाठी काढता पाय घेतला. मात्र नगर शहर तसेच तिनही मतदार संघात शिवसेना जिंवत ठेवण्यासाठी २९ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहे. पारनेर शिवसेनेची मधुन डॉ. श्रीकांत पठारे हे देखील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तसेच माजी जिल्हा परिषद माधवराव लामखडे हे हि उमेदवारी वर ठाम आहे. तिघे मिळून एक उमेदवार देऊ.

फकीर उमेदवाराला हा मतदारसंघ भाग्यवान
पारनेर मतदारसंघात फकीर उमेदवाराचा विजय झाला. पण मी खरा फकीर आहे. यावेळी कार्यकर्त्याचे उमेदवारी बाबत मते जाणून घेतले .आता निवडणूक लढवायचीच मागे हटायचे नाही असा सुर सर्वांचा आला असे कार्ले यांनी स्पष्ट केले .

नगर जिल्हयात शिवसेनेच्या खच्चीकरणाची किमंत मोजावी लागेल
स्वतःच्या माणसाची सोय करण्यासाठी श्रींगोदा मतदार संघात उमेदवारी दिली. जिल्हा प्रमुखाच्या पत्राला, अहवालाला जी किंमत असते ती दिली नाही.जे मागीतले नाही ते आमच्या पदरात टाकल. जिथे आमचे ताकदवार उमेदवार आहे तिथे दिले नाही. नेमके शिवसैनिकाचे खच्चीकरण कोण करते , त्यांचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. पारनेर ,नगर शहर जागा मिळाली नाही अशा ठिकाणी महाविकास आघाडीला फटका बसू शकतो. शिवसेनेचा उमेदवार दिला नाही तर आम्हांला गृहित धरू नये असेही कार्ले यानी यावेळी सांगीतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेर तापलं! आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला, बाजारपेठ बंद आणि महायुतीचा मोर्चा, मंत्री विखे पाटील काय म्हणाले, पहा..

संगमनेर । नगर सहयाद्री:- गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण आधीच तणावपूर्ण असताना,...

गुलाल घेतल्याशिवाय मागे हटणार नाही; आझाद मैदानावरून मनोज जरागेंची मोठी गर्जना!

मुंबई | नगर सह्याद्री राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा...

रस्त्यावर अनधिकृत बांधकाम; 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, अहिल्यानगर क्राईम वाचा एका क्लिकवर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे भिंत...

रानात हत्येचा थरार! नवऱ्याचे बायकोवर धारदार शस्त्राने डझनभर वार, कारण काय?

Maharashtra Crime: परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सोनपूर तांडा येथे पतीने पत्नीवर शेतामध्ये धारदार शस्त्राने...