spot_img
ब्रेकिंगसलमान खानसोबतची मैत्री भोवली? लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात पोस्ट...

सलमान खानसोबतची मैत्री भोवली? लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात पोस्ट…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सुरुवातीपासूनच या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर येत होते. अखेर एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी घेतली आहे. शुब्बु लोणकर नावाच्या व्यक्तीने फेसबुक पोस्ट करत जबाबदारी घेतली आहे. तसंच, या फेसबुक पोस्टमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचेही नाव घेण्यात आले आहे. त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.

बाबा सिद्दीकी हे राजकीय नेते असले तरी अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. सलमान खान, शाहरुख खान यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री होती. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकीय खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच लॉरेन्स बिश्नोईवर संशय व्यक्त करण्यात येत होता.

आता शिब्बू लोणकर या फेसबुक आयडीवरुन एक पोस्ट करण्यात आली आहे. यात त्यांनी हत्येची जबाबदारी घेतली आहे. मात्र, झी 24 तास या फेसबुक पोस्टची पुष्टी करत नाही.

पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सलमान खान आम्हाला हे युद्ध नको होतं. पण तु आमच्या भाईचं नुकसान केलंस. आज जे बाबा सिद्दीकी यांच्या सभ्यतेचे कौतुक करण्यात येतंय. तेच एकेकाळी दाउदसोबत मकोका अॅक्टमध्ये सामील होता. त्यांची हत्या करण्याचं कारण अनुज थापन आणि दाऊनला बॉलिवूड, राजनीती आणि प्रॉपर्टी डिलिंगमध्ये जोडणं… आमची कोणासोबतच दुश्मनी नाहीये. पण जे लोक सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करतील त्यांना हिशोब चुकता करावा लागेल. आमच्या कोणत्याची भावाला नुकसान पोहोचवलत तर आम्ही प्रतिक्रिया जरुर देणार. आम्ही पहिले वार कधीच केला नाही.

या पोस्टनंतर लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई असे काही हॅशटॅग देण्यात आले आहेत. तसंच, या पोस्टमधून थेट एक प्रकारे सलमान खान याच्यावर निशाणा साधण्यात आल्याचे कळतंच. शिब्बु लोणकर नावाच्या व्यक्तीने ही पोस्ट केली आहे. दरम्यान, पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींनीही लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता या प्रकरणात पोलिस काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पोस्टची सत्यता पडताळणार
ज्या पोस्टवरुन हत्येची जबाबदारी घेण्यात आली आहे. त्या पोस्टची सत्यता तपासण्यात येत आहे. मुंबई पोलिसांकडून केंद्रीय तपास यंत्रणांकडून या पोस्टची पडताळणी करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...