spot_img
ब्रेकिंगबाजार समितीचे माजी संचालक रावसाहेब चोभे यांचे निधन

बाजार समितीचे माजी संचालक रावसाहेब चोभे यांचे निधन

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री-

नगर कृषि उत्पन्न बाजार समिती, नगर तालुका साखर कारखान्याचे माजी संचालक रावसाहेब मंजाबा चोभे (वय-७७) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
नगर तालुयातील बाबुर्डी बेंद गावच्या व तालुयाच्या राजकारणात ते सक्रिय होते.

१५ वर्ष त्यांनी नगर बाजार समितीचे संचालक पद भूषवले. तर नगर तालुका साखर कारखान्याचे पाच वर्ष ते संचालक होते. विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन, गावचे सरपंच पद त्यांनी भूषवले. स्व. रावसाहेब चोभे हे माजी खासदार दादापाटील शेळके यांचे एकनिष्ठ होते. स्व. चोभे यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी सभापती हरिभाऊ कर्डीले, अभिलाष घिगे, संचालक संतोष म्हस्के, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, उपसभापती रभाजी सुळ, सुधीर भापकर, गोरख काळे, बन्शी कराळे, बाळासाहेब दरंदले, दत्तात्रय गिरवले, बहिरनाथ वाकळे, बबन वाकळे, दादा दरेकर, प्रशांत गहीले, डॉ. अनिल ठोंबरे यांसह विविध गावचे सरपंच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर बाजार समितीचे माजी उपसभापती रेवनणाथ चोभे, दूध संघाच्या संचालिका पुष्पाताई शरद कोठुळे यांचे ते वडील होत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अण्णासाहेब पाटील महामंडळात बोगस लाभार्थी; असे आले उघडकीस…

​बनावट कागदपत्रांद्वारे शासनाचा व्याज परतावा लाटला; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मराठा...

बिहार तो झांकी है, अहिल्यानगर अभी बाकी है!

मिलिंद गंधे / शहर भाजपच्या वतीने बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बिहार...

बिहारमध्ये NDA ला यश, महाराष्ट्रात जल्लोष, पेढे वाटले, ढोल वाजले

मुंबई / नगर सह्याद्री - बिहार विधानसभा निवडणूक २०२५चा आज (१४ नोव्हेंबर) निकाल जाहीर...

बिबट्यांचे हल्ले; पालकमंत्री विखेंनी घेतली मोठी भूमिका

बिबट्यांच्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा नियोजनातून ८ कोटी १३ लाखांचा निधी – पालकमंत्री डॉ....