spot_img
अहमदनगरअहमदनगरच्या इतिहासात प्रथमच ! विद्यापीठ खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेत सुदर्शन कोतकर यांनी...

अहमदनगरच्या इतिहासात प्रथमच ! विद्यापीठ खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेत सुदर्शन कोतकर यांनी पटकावले रौप्यपदक

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : अहमदनर जिल्ह्याचा डंका विविध क्षेत्रात नेहमीच गाजत असतो. नाट्य, संगीत, कला, क्रीडा क्षेत्रात अहमदनगरच्या युवक युवतींनी आपला ठसा उमटवलेला आहे. आता अहमदनगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कोहिमा नागालँड येथे सुरू असलेल्या विद्यापीठ खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेत अहमदनगरमधील केडगाव येथील पैलवान सुदर्शन कोतकर याने १२५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. सुदर्शन पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत आहे. १२५ किलो वजनी गटात खेळताना पैलवान सुदर्शन याने दिल्ली, हरियाणा राज्यातील अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पैलवानांना पराभूत करून रौप्यपदक आपल्या नावावर केले. अहमदनगरच्या कुस्तीच्या इतिहासात खुल्या गटामध्ये अशी कामगिरी प्रथमच झाली आहे.

सुदर्शन हा पुण्यातील शिवराम दादा तालीम येथे हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित कटके यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवत आहे. सुदर्शनने महाराष्ट्र केसरी कुस्तीमधेही कांस्यपदक पटकावलेले आहे. सुदर्शनच्या या यशाबद्दल नगरसेवक पैलवान संग्राम शेळके, युवा सेना शहर प्रमुख पैलवान हर्षवर्धन कोतकर, विविध क्षेत्रातील मान्यवर आदींनी अभिनंदन केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Sujay vikhe patil : ‘विखे कुटुंबीयांचे योगदान जनता विसरणार नाही, विखेंनाच निवडून देतील’

राहुरी / नगर सह्याद्री Sujay vikhe patil : विखे कुटुंबीयांनी गेली तीन पिढ्यापासून जिल्ह्यासाठी...

मंदिरचा चौथरा पाडला, ग्रामस्थ आक्रमक; नगर तालुक्यातील ‘या’ गावात घडला प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री नवनागापूरमध्ये छत्रपती नगर परिसरात आठ महिन्यापूर्वी लोकवर्गणीतून ओपन स्पेसमध्ये बांधलेले शनी...

सुजय विखेंच्या रॅलीत झळकले संदीप कोतकरांचे बोर्ड…

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ कोतकर यांची भव्य बाईक रॅली अहमदनगर | नगर...

Ahmednagar crime : अतिक्रमणावरून गौरी घुमट परिसरात राडा

अहमदनगर | नगर सह्याद्री Ahmednagar crime : अतिक्रमण काढण्यावरून गौरी घुमट परिसरात दोन गटात हाणामारीची...