spot_img
अहमदनगरAhmednagar crime : अखेर घरफोडी करणार्या दोघांना ठोकल्या बेड्या, सव्वा लाखाचा मुद्देमाल...

Ahmednagar crime : अखेर घरफोडी करणार्या दोघांना ठोकल्या बेड्या, सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

spot_img

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
कर्जत । नगर सहयाद्री-
Ahmednagar crime : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्जत परिसरातील घरफोडी केलेले दोन आरोपी गजाआड केले आहे. कोहिनुर ऊर्फ सोल्जर जवान काळे ( वय 22, रा. शेडगांव फाटा, ता. श्रीगोंदा ) अशोक बबन भोसले ( रा. कासारी, ता. आष्टी, जिल्हा बीड हल्ली रा. हिरडगांव फाटा, ता. श्रीगोंदा ) यांना ताबयात घेतले असून साथीदार जग्गु भोसले ( रा. खोरवडी, ता. दौंड, जिल्हा पुणे ) हा फरार आहे.

अधिक माहिती अशी: राघु पांढरु लकडे ( वय ४५, रा. जलालपुर शिवार, ता. कर्जत ) यांच्या बंद घराची कडी उघडुन २ लाख ५७ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम चोरीला गेल्याची फिर्याद कर्जत पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक नेमून ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउनि/सोपान गोरे अंमलदार रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले, फुनकान शेख, देवेंद्र शेलार, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ व अरुण मोरे अशांचे पथक नेमुन ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

स्थागुशा पथक दिनांक 26 एप्रिल 24 रोजी कर्जत परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पथकास वरील प्रमाणे दाखल गुन्हा हा आरोपी नामे कोहिनूर ऊर्फ सोल्जर जवान काळे [रा. शेडगांव फाटा, ता. श्रीगोंदा] याने त्याचे साथीदारांसह केला असुन तो जलालपुर, ता. कर्जत बस स्टॅण्ड परिसरात येणार आहे अशी गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच जलालपुर, ता. कर्जत बस स्टॅण्ड रोडवर सापळा लावुन थांबलेले असतांना 1 इसम संशयीतरित्या येताना पथकास दिसला. त्यावेळी पथकाची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नावे 1) कोहिनुर ऊर्फ सोल्जर जवान काळे वय 22, रा. शेडगांव फाटा, ता. श्रीगोंदा असे सांगितले. त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्याचे अंगझडतीत 10,000/- रुपये रोख रक्कम मिळुन आली. सदर रोख रकमे बाबत विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार नामे जग्गु भोसले (फरार) रा. खोरवडी, ता. दौंड, जिल्हा पुणे असे दोघांनी मिळुन तळवडी, ता. कर्जत येथील एका घरातुन चोरी केलेली रोख रक्कम असल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपीकडे अधिक विचारपुस करता त्याने काही दिवसांपुर्वी जलालपुर, ता. कर्जत येथील बंद घरातुन व राशिन, ता. कर्जत येथुन चोरी करुन चोरीचे दागिने अशोक भोसले [रा. आष्टी, जिल्हा बीड हल्ली रा. हिरडगांव फाटा, ता. श्रीगोंदा] यास विक्री केल्याचे सांगितले. पथकाने लागलीच आरोपीचे साथीदाराचा शोध घेता आरोपी अशोक बबन भोसले हा हिरगांव फाटा येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले.

आरोपी अशोक भोसले यास विश्वासात घेवुन त्याचेकडे सोन्याचे दागिन्याबाबत विचारपुस करता त्याने 1,08,000/- रुपये किंमतीचे विविध प्रकारचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व 30 भाराचे चांदीचे दागिने काढुन दिल्याने ते जप्त करण्यात आलेले आहे. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
ताब्यातील दोन्ही आरोपींचे कब्जात 1,18,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने दोन्ही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेवुन कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...