spot_img
ब्रेकिंगठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर शिंदे गटाने डाव टाकला? 'यांना' दिली प्रमुख...

ठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर शिंदे गटाने डाव टाकला? ‘यांना’ दिली प्रमुख पदाची जबाबदारी

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सगळीकडे सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्रभर दौरे सुरु केले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप आणि हेवे दावे करण्यात येत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांना पुन्हा आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेले विजय करंजकर यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे करंजकर हे नाराज होते. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.

अखेर रविवारी विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुंबईमध्ये शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. विजय करंजकर यांच्यावर उपनेते आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर उबाठा शिवसेना गटाला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...