spot_img
महाराष्ट्रअखेर ठरलं! अधिकृत घोषणा बाकी! पटोलेंचे निवडणूक आयोगाला भलतेच पत्र

अखेर ठरलं! अधिकृत घोषणा बाकी! पटोलेंचे निवडणूक आयोगाला भलतेच पत्र

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री
राज्यातील महायुतीच्या सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदाबाबत जवळपास निर्णय झाले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची चर्चा झाली. या चर्चेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्रीची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. केवळ ओपचारिकता बाकी असल्याचे म्हटले जात आहे.

काल रात्री दिल्लीत बैठक झाल्यानांत आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्या मूळगाव देरे सातारा येथे जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान नव्या सरकार स्थापनेची प्रक्रिया लवकर पाड पडणार असून मुख्यमंत्रिपदाचा नावाची औपचारिक घोषणेसाठी अजून दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. मुंबईत आजही महायुतीची महत्त्वाची बैठक आज दुपारी दोननंतर वर्षां बंगल्यावर होणार होती. मात्र ही बैठक दोन दिवस पुढे ढकलण्यात आलीय.

दुसरीकडे नव्या सरकारचा 2 डिसेंबरला शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या शपथविधीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह काही मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. महायुतीच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचपणी सुरु झालीय. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि बीकेसी मैदानाची चाचपनी सुरु असल्याची माहिती मिळते. वानखेडे स्टेडियम, शिवाजी पार्क, आणि आझाद मैदान उपलब्ध नसल्याने इतर पर्यायांचा विचार सुरू असल्याची माहिती आहे.

मतदानाच्या टक्केवारीत घोटाळा: वाढीव मतदानाचे पुरावे द्या; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 20 नोव्हेबर रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत 65.2 टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी 66.5 टक्के होती, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. निवडणूक आयोगाने स्वत: अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत 1.03 टक्क्यांची तफावत कुठून आली? असा सवाल नाना पटोले यांनी पत्राद्वारे केला आहे.

पटोले म्हणाले, निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी 5 नंतर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या? याचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे निवडणूक आयोगाने जाहीर करावेत, अशी मागणीही नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

तसेच एका दिवसात तब्बल 9 लाख 99 हजार 359 मतांची वाढ कशी झाली? असा सवाल देखील नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे. मतांच्या टक्केवारीतील तफावत पाहता हा प्रकार गंभीर व चिंताजनक वाटत आहे. मतांच्या या वाढीबद्दल जनतेच्या मनातच शंका उपस्थित होत असतील तर त्या दूर करणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. निवडणूक आयोगाने स्वतः पुढे येऊन आपली भूमिका पुराव्यासह स्पष्ट करावी आणि जनतेच्या मनातील शंकांचे समाधानकारक उत्तर द्यावे, असे या पत्रात नाना पटोले यांनी म्हटले आहे. आता पटोलेंच्या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजपचं सरकार, त्यामुळे अण्णा हजारे यांना अजार..?, म्हणून ते आराम करत आहेत; रोहित पवारांनी साधला निशाणा

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे भाजपचे सरकार आल्यानंतर आजारी पडले असतील,...

विधानसभा संपली आता मनपा, झेडपी! मतदारयादी, प्रभाग, गट, गण फेररचनेकडे सर्वांचे लक्ष

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- लोकसभा निवडणुकीपाठोपाठ नुकतीच विधानसभा निवडणूकही संपली आहे. त्यामुळे गाव, तालुका व...

अण्णा झोपले; बाबांचे आत्मक्लेष! खा. संजय राऊत यांनी साधला निशाणा

मुंबई | नगर सह्याद्री:- आता पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने 200 पेक्षा अधिक जागा...

मंत्रीमंडळ लांबणीवर..! कारण काय? वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री:- सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या...