spot_img
आरोग्यअण्णा झोपले; बाबांचे आत्मक्लेष! खा. संजय राऊत यांनी साधला निशाणा

अण्णा झोपले; बाबांचे आत्मक्लेष! खा. संजय राऊत यांनी साधला निशाणा

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री:-
आता पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने 200 पेक्षा अधिक जागा जिंकल्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केलीये. फेरमतमोजणीची मागणीही काही उमेदवारांनी केली असून हळूहळू या निकालाला विरोध वाढताना दिसत आहे. अशातच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 95 वषय बाबा आढाव यांनी यासंदर्भातच आत्मक्लेष आंदोलन सुरू केलं आहे. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आढाव यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला.

आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास हा विषय आणला आहे. बाबा आढाव यांच्यासारखा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता ईव्हीएमच्या घोटाळ्याविरूद्ध लोकशाही वाचवण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करत आहे. याची जाणीव महाराष्ट्राच्या जनतेने ठेवावी. भले अण्णा हजारे झोपले असतील अन्य सगळे लोक जे ऐरवी क्रांतीच्या मशाली पेटवतात ते झोपले असतील पण लोकशीहीची मशाल विझू नये म्हणून बाबा आढावांसारखा नेता रस्त्यावर उतरला आहे याची आम्ही जाणीव ठेवतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप पक्षाला यांच्याकडून जे काम करायचं होतं ते करून झालंय. महाराष्ट्र त्यांनी कमजोर केला, राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन पक्ष फोडण्यासाठी यांची मदत घेतली आणि वापर केला. आता त्यांचं कार्य संपलं आहे. भविष्यामध्ये जर यांचे पक्ष फोडले आणि भाजपने बहुमत स्थापन केलं तर कोणाला आश्चर्य वाटणार नसल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं.

लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू झालंय, या विरोधात आवाज उठविणे गरजेचे
देशात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू झालं आहे. रोज लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये सरकारी पैशांचा मोठा गैरवापर झाला. लोकसभेचा निकाल आणि त्यानंतर विधानसभा निवडुकीचा लगेच वेगळा निकाल कसा लागतो? असा सवाल करत बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचं सांगत यांच्याविरोधात आवाज उठवण्याचं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....