spot_img
अहमदनगरहिंद सेवा मंडळ विश्वस्थांविरोधात गुन्हा नोंदवा! पत्रकार परिषदेत 'मोठा' आरोप, नेमकं प्रकरण...

हिंद सेवा मंडळ विश्वस्थांविरोधात गुन्हा नोंदवा! पत्रकार परिषदेत ‘मोठा’ आरोप, नेमकं प्रकरण काय?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
हिंद सेवा मंडळाच्या ताब्यातील ३ एकर २९ गुंठे नगर मनमाड रोड लगत असणारी जमीन संगनमताने, कटकारस्थान रचत अवघ्या २५ कोटी रुपयात ताबा सोडण्याबाबत बेकायदा ठराव करण्यात आला. याची सरकारी किंमत ३२ कोटी व बाजार भाव ४०० कोटी रुपये असताना जाणीवपूर्वक फक्त २५ कोटी रुपयात ताबा सोडण्याबाबत ठराव घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी वसंत लोढा, दीप चव्हाण, संजय घुले यांनी संस्थेचे विश्वस्त अजित सिमरतमल बोरा, अनंत रामचंद्र फडणीस, शिरीष दामोदर मोडक, संजय जोशी व इतर विश्वस्थांविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, आम्ही हिंद सेवा मंडळाचे आजिव सभासद आहोत. हिंद सेवा मंडळाने १४/११/१९६४ रोजी सावेडी येथील सनं १६१ -१ ही ९९ वर्ष भाडेपट्टाने सय्यद हाजी हमीद ताकीया सावेडी ही देवस्थानची मिळकत ५०० रुपये प्रती वर्षाने शैक्षणिक कारणासाठी घेतली होती. याचा भाडेपट्टा ४० वर्ष अजून शिल्लक आहे.

असे असतानाही हिंद सेवा मंडळाचा विश्वस्त अजित सिमरतमल बोरा याने स्वतःच्या फायदयासाठी इतर काही विश्वस्थांना आर्थिक प्रलोभन देत संस्थेचे नुकसान करत ही जागा तिराहित इसमांना २५ कोटी रुपयात देण्यासाठी तयार करत ठराव केला असे यावेळी म्हटले आहे.

वसंत लोढा म्हणाले, आम्ही ही जागा जाऊ देणार नाही. वफ बोर्डाकडे या जागेची नोंद आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही तक्रारी दाखल केल्या आहेत. या विरोधात आवाज उठवल्यानंतर शहरातील अनेक मंदिरे, मस्जिद, चर्च आदींचं जागांची तसेच शहरातील ताबेमारीची प्रकरणे आली आहेत त्याविरुद्ध आवाज उठवणार आहोत.

अजित सिमरतमल बोरा लुणीयाचा पार्टनर?
अजित सिमरतमल बोरा याने खरेदीखत दस्तवर याने साक्षीदार म्हणून सही केली आहे. तो फर्म लुणीया मुनोत आणि कंपनी, १०१ राहुल अपार्टमेंट, अहमदनगर पार्टनर रसिकलाल झुंबरलाल लुणीया याचा भागीदार आहे. ही बाब लपवून सध्या तो हिंद सेवा मंडळाचा मागील १५ वर्षांपासून विश्वस्थ आहे. ही मिळकत देवस्थान इनाम वर्ग ३ असून अशी मिळकत राज्य शासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय हस्तांतर करता येत नाही, असे असतानाही पदाचा गैरवापर करून ही मिळकत हस्तांतरित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...