मुंबई | नगर सह्याद्री
मराठा आरक्षणासंदर्भात सुरु असलेला वाद आता अधिकच चिघळला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना मनोज जरांगेंनी इशारा दिल्यानंतर ओबीसी समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
ओबीसी समाजाचे नेते बबनराव तायवाडे यांनी या इशाऱ्याचा निषेध करत, मनोज जरांगे समाजात तेढ निर्माण करत आहेत; त्यामुळे त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. .
दरम्यान, मनोज जरांगेंनी तायवाडेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, दोन वर्षांपूर्वी अंबड येथे झालेल्या सभेचा दाखला दिला आणि छगन भुजबळ यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे
या सर्व पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी १० ऑक्टोबर रोजी हैदराबाद गॅझेटियरच्या जीआरविरोधात आंदोलनाची घोषणा केल्यानंतर, हा संघर्ष अधिक उफाळून आला आहे. वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाच्या हक्कांचे रक्षण करण्याचा नारा दिला, जो थेट मनोज जरांगेंच्या टीकेचा विषय ठरला आहे.