spot_img
अहमदनगरनगर तालुक्यात पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान; पालकमंत्र्यांनी दिले असे आदेश, काय म्हणाले...

नगर तालुक्यात पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान; पालकमंत्र्यांनी दिले असे आदेश, काय म्हणाले पहा…

spot_img

सुनील चोभे | नगर सह्याद्री
सतत होणार्‍या पावसामुळे पूर्वा व वालुंबा नदीला पूर आला होता. पुरामुळे अकोळनेर, भोरवाडी, सारोळा कासार, खडकी, वाळकी परिसरातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात शेळ्या, गायी, बैल, म्हैस वाहून गेल्या आहेत. घरात पाणी शिरल्याने धान्य भिजले आहे. संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्याचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. दरम्यान, शासन स्तरावर नुकसान भरपाईबाबत निर्णय घेऊन तातडीने मदत मिळवून देवू असे आश्‍वासन मंत्री विखे पाटील यांनी शेतकर्‍यांना दिले.

मंगळवारी नगर तालुक्यात ढगफुटी सदृष पाऊस झाला. या पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोळनेर, खडकी येथे केली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार काशीनाथ दाते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी सभापती अभिलाष पाटील घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट, प्रतिक शेळके, माजी सरपंच प्रविण कोठुळे, राघु चोभे, मनेष भोसले, बाळासाहेब कोठुळे, राहुल बहिरट यांच्यासह अकोळनेर व खडकी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या भावना समजून घेतल्या. नुकसान झाले त्या ठिकाणची पाहणी केली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना, महिलांना पालकमंत्र्यांसमोर अश्रू अनावर झाले. पालकमंत्र्यांनी नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना धीर देत तातडीने संबंधित अधिकार्‍यांना नुकसान झालेल्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच सरकार दरबारी पाठपुरावा करुन तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.

अविरत पडणार्‍या मुसळधार पावसाुळे जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील खडकी व वाळकी गावामध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. गावाध्ये पाण्याची पातळी करेपर्यंत पोहोचली होती. पुराच्या पाण्यात रहिवासी अडकून पडले होते. पुरात अडकलेल्या नागरिकांना लष्कराच्या दतीने खडकी येथून 10 व वाळकी येथून 15 जणांना बाहेर काढण्यात आले.

दरम्यान बुधवार सकाळपासून नुकसानग्रस्त भागात महसूल प्रशासनाच्यावतीने पंचनामे करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पुराच्या पाण्यामुळे 100 पेक्षा अधिक जनावरे व 200 शेळ्या वाहून गेल्या असल्याची माहिती मिळत आहे. महावितरणचे सुमारे 200-300 पोल पडले आहेत. विद्युत रोहित्र पडले असल्यामुळे गावागावांमध्ये विजेचा खेळखंडोबा झाला आहे. धो धो पावसामुळे रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. पूल वाहून गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...