spot_img
अहमदनगरगुटखा बंदीचे भयाण वास्तव समोर; हेरंब कुलकर्णी म्हणाले गुटखा बंदी ही...

गुटखा बंदीचे भयाण वास्तव समोर; हेरंब कुलकर्णी म्हणाले गुटखा बंदी ही…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री-
गुटखा बंदी पूर्णतः फसलेली असून याबाबतची जबाबदारी प्रशासकीय स्तरावर सर्व अधिकारी एकमेकांवर ढकलत आहेत. अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे, ही चिंतेची बाब आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते व या विरोधात आवाज उठविला म्हणून एका जीवघेण्या हल्ल्याला सामोरे जावे लागलेले मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी उद्वीग्नतेने व्यक्त केले.

दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते व मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर दोन महिन्यापूर्वी अहमदनगर शहरामध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. हेरंब कुलकर्णी ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्या शाळेच्या आजूबाजूला असलेल्या गुटखा आणि अवैध्य व्यवसायाच्या विरोधात त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला पत्र देऊन अवैध टपर्‍या काढण्याची मागणी केली होती. या कारणावरून कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती.

या घटनेला दोन महिने होऊन गेले व नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सुमारे ३२ आमदारांनी या हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधी उपस्थित केली. मात्र या हल्ल्याच्या घटनेनंतरही अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती बदलली नसून जिल्ह्यातील अवैद्य गुटखा विक्री आणि अवैध धंदे सुरू असल्याचे हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.

कुलकर्णी म्हणाले, नगर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता गुटखाबंदी फसलेली बंदी आहे. गुटखा बंदी आणि गुटख्याचे दुष्परिणाम याबाबत जागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे होते. सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून जनजागृती व्याख्याने घेऊन तरुणांमध्ये या घातक पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. मात्र प्रशासन स्तरावर कोणतीही कार्यवाही होत नाही. शासनाने जी गुटखाबंदी केली आहे त्यामुळे गुटखा विक्री करण्याचे प्रमाण वाढले असून यामध्ये पोलिसांचे हप्ते वाढले.

गुटखा शरीराला घातक असल्यामुळे तरुणांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर प्रशासनामध्ये थोडी चलबीचाल झाली; मात्र कुठल्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय किंवा अ‍ॅशन सरकारकडून होताना दिसत नाही. राज्यातील सर्वच भागात गुटखा, मावा खुलेआम विक्री होते. अन्न औषध प्रशासन याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत आहे. मावा, गुटखा विक्रीच्या टपर्‍या महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून लावण्यात येतात. महापालिकाही याकडे दुर्लक्ष करते. संपूर्ण जिल्ह्यात याच प्रकारे सर्व अवैध धंदे सुरू आहेत. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर माझ्यामागे सर्वजण ठामपणे उभे राहतील असे संपूर्ण प्रशासनाने सांगितले होते; मात्र माझ्यावर प्रेम असले तरी तरुण पिढी वाचवण्यासाठी हे सर्व विनाशकारी अवैध धंदे बंद होणे गरजेचे आहे, असेही कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरमध्ये आढळलेल्या मृतदेहाचा उलगडा; प्रेयसीने घेतला प्रियकराचा जीव!, वाचा क्राईम..

संगमनेर । नगर सहयाद्री तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील शिवप्रभा ट्रस्टमध्ये एका तरुणाचा 12 ऑक्टोबर...

आर्थिक स्थिती राहणार मजबूत, कोणाला मिळणार पगारवाढीची गूडन्यूज ? वाचा, आजचे राशी भविष्य!

मुंबई । नगर सह्याद्री मेष राशी भविष्य तुम्हाला निवांत आरामाची गरज आहे आणि जवळचे मित्र व...

मनपाची प्रभाग रचना, आरक्षण जाहीर करण्यास विलंब का? ; मनमानी पद्धतीने प्रभागांची तोडफोड करू देणार नाही

  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांचा इशारा अहिल्यानगर / नगर सह्याद्री- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश...

आरक्षण सोडतीने पारनेरचे राजकारण तापले; महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी...