spot_img
अहमदनगरखळबळजनक ! शहरातून मुली, मुले बेपत्ता, आ. जगताप आक्रमक

खळबळजनक ! शहरातून मुली, मुले बेपत्ता, आ. जगताप आक्रमक

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : शहरातून मुले मुली बेपत्ता होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. वैभव म्हस्के (वय १५ वर्षे रा. माणिकनगर), कोमल शिंदे (वय २३ वर्षे रा.दुधसागर) हे अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत.

परंतु त्यांचा शोध मात्र लागत नाही. त्यामुळे आ. संग्राम जगताप यांनी आक्रमक होत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला याना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटलं आहे की, शहरातील मुले बेपत्ता होतात. त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार देऊनही पोलीस मात्र तपास लावण्यात अपयशी ठरत आहे. मुलांचा तपास लागत नसल्याने कुटुंबीय, नातेवाईक हे मात्र चिंताग्रस्त झाले आहेत. बेपत्ता मुलांच्या आईवडिलांची मानसिक स्थिती अत्यंत खराब झाली आहे.

परंतु बेपत्ता मुलांचा काहीच थांगपत्ता लागत नाहीत. शहरातील मुले बेपत्ता होऊन २० ते २५ दिवस झाले आहेत. परंतु पोलिसांना तपास लावण्यात यश मिळाले नाही. तरी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन बेपत्ता मुलामुलींचा तपास तातडीने करावा अशी मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे, सुमित कुलकर्णी, श्रेणिक शिंगवी, पालक नातेवाईक उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चेन स्नॅचिंग करणार्‍या टोळीच्या मुस्क्या आवळल्या

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी | चौदा गुन्ह्यांची उकल अहमदनगर | नगर सह्याद्री जिल्ह्यात चेन स्नॅचिंग...

Ahmednagar Crime: नगर पुन्हा हादरले! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या

अहमदनगर । नगर सहयाद्री- नगर शहर पुन्हा एका घटनेने हादरले आहे. किरकोळ कारणावरून दोन परप्रांतीय...

कुकडी कालव्यालाच्या आवर्तना बाबत सुजित झावरे पाटलांनी दिली महत्वाची अपडेट, वाचा सविस्तर

अमर भालके। नगर सहयाद्री कुकडी डावा कालव्याचे येत्या ३१ मे पासून आवर्तन सोडण्यात येणार...

Ahmednagar Breaking: प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या २ युवकांचा शोध घेण्यासाठी आलेल्या ‘एसडीआरएफ’ पथकाची बोट उलटली? ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

अकोले | नगर सह्याद्री उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये सहा जण बुडाल्याची घटना ताजी असतानाच आता...