अहमदनगर। नगर सहयाद्री
दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी पीडित अल्पवयीन च्यामुलीं पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एक गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला आहे.
भिंगार शहरातील एका अल्पवयीन मुलीला (वय १५) रविवारी दुपारी १२ वाजता तिच्या राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. तिच्या नातेवाईकांनी मुलीचा शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. त्यानंतर आईने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करीत आहेत.
नगर तालुयातील एका गावातील अल्पवयीन मुलीला (वय १२) अज्ञात व्यक्तीने शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास पळवून नेले. मुलीच्या नातेवाईकांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी मुलीचा परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही. मुलीच्या वडिलांनी रविवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ करीत आहेत.
अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तिसरी घटना नगर तालुयातील एका गावात घडली. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीला (वय १३) अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. नातेवाईकांनी शोध घेऊनही ती मिळून आली नाही. या प्रकरणी मुलीच्या आईने रविवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.