spot_img
अहमदनगरशहरात खळबळ! वादाने टोक गाठलं! २४ वार करणाऱ्या आरोपीला १२ तासात...

शहरात खळबळ! वादाने टोक गाठलं! २४ वार करणाऱ्या आरोपीला १२ तासात अटक

spot_img

Crime News : शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत असून, मंगळवारी रात्री बीड मधील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मित्राने दुसऱ्या मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून संतप्त मित्राने विजय काळे (वय अंदाजे २५) याच्यावर धारदार हत्याराने सपासप वार करून त्याचा जीव घेतला.

ही घटना घडताच परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, स्थानिक पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.

प्राथमिक माहितीनुसार, काही किरकोळ कारणावरून विजय काळे याचा मित्रांसोबत वाद झाला होता. वादाचा राग मनात ठेवून आरोपीने विजयच्या छातीत धारदार शस्त्राने वार केले. विजय काळे रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत कोसळला. तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासाची चक्रे गतीने फिरवत पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन १२ तासांच्या आत अटक केली.

मात्र, वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.स्वराज्य नगर आणि आजूबाजूच्या परिसरात या घटनेनंतर तणाव निर्माण झाला आहे. नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी त्वरीत कारवाई करून आरोपीला अटक केल्याने परिस्थिती अंशतः नियंत्रणात आली असली, तरी अशा घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...

पोटदुखीवर मुख्यमंत्री उपाय करतील! राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले, ‘यांचे’ वक्तव्य चर्चेत..

मुंबई | नगर सहयाद्री मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयावरुन राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा...

नगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव शिवारात अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली पलटी; दोन ठार, तिघे गंभीर जखमी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव शिवारात गुरुवारी (दि. ४ सप्टेंबर) पहाटे साडेचारच्या...