spot_img
देशजगाला धडकी भरवणाऱ्या ओपन एआयमध्ये खळबळ ! ChatGPT चा सर्वेसर्वा सॅम ऑल्टमनला...

जगाला धडकी भरवणाऱ्या ओपन एआयमध्ये खळबळ ! ChatGPT चा सर्वेसर्वा सॅम ऑल्टमनला नोकरीवरून काढून टाकले

spot_img

नगर सह्याद्री टीम : चॅटजीपीटी हे तंत्रज्ञान सध्या वरचढ आहे. अवघ्या जगाला ध़डकी या टेक्निकने भरवली आहे. परंतु आता जगाला धडकी भरवणार टेक्निक सुरु करणाऱ्या अर्थात कंपनीने सीईओ आणि सह संस्थापक सॅम ऑल्टमनला नोकरीवरून काढून टाकले आहे.

कंपनीला पुढे घेऊन जातील असा विश्वास ऑल्टमनवर नसल्याने त्यांना बाजुला करून भारतीय वंशाच्या मीरा मुरत्ती या अंतरिम सीईओ असणार असल्याची माहिती मिळाली आहे. चॅट जीपीटी गेल्या वर्षी लाँच झाले. मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज कंपनीचा त्याला वरदहस्त मिळाला आहे.

अनेकांच्या नोकऱ्या यामुळे जातील अशी भीती निर्माण झाली होती. ऑल्टमन बाहेर पडल्यानंतर, सीटीओ मीरा मुरत्ती या अंतरिम सीईओची भूमिका स्वीकारणार आहेत. कंपनी कायमस्वरूपी सीईओसाठी शोध सुरू ठेवणार आहे.
एवढेच नाही तर OpenAI चे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन हे बोर्डाचे अध्यक्षपद सोडणार आहेत. ओपन एआयमध्ये जेवढा काळ काम केले मला आनंद मिळाला, असे ट्विट ऑल्टमनने केले आहे. कंपनीत प्रतिभावान लोकांसोबत काम करताना मला सर्वाधिक आनंद झाला आहे, असे तो म्हणाला.

कंपनीच्या बोर्डाने खूप विचारविनिमय केल्यानंतर ऑल्टमन यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सॅम त्यांच्याशी चर्चा करताना स्पष्ट नव्हता. यामुळे बोर्डाला त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अडथळा आला. बोर्डाला आता ऑल्टमनच्या क्षमतेवर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे, असे ओपन एआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar: सैनिकाला मारहाण..; नगरच्या ‘या’ भागात ‘धक्कादायक’ प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री- सैनिकाच्या पत्नी विषयी समाजात वाईट बोलून त्यांची बदनामी केली. याबाबत जाब...

‘महसूलमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातुन तीन कोटी निधी’

सागर मैड यांची पत्रकार परिषदेत माहिती सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा गावात येत्या काळात...

…म्हणून प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना महत्व, जाणून घ्या सविस्तर

नगर सहयाद्री टीम- प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना फार महत्व दिले जात होते. बाजारात चककणारी व...

‘गोड’ साखरेचा हंगामा ‘कडवट’, साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या बांधावर

नगर सह्याद्री टीम- यंदा पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थितीत उसाचे उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे. सुरू झालेल्या...