अहिल्यानगर। नगर सहयाद्री :-
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले आहे. काल बुधवारी (दि. २०) रोजी पहाटे वन विभागाने लावलेल्या पिंजर्यात मादी जातीचा साधारणतः अडीच वर्षे वयाचा बिबटया अडकला. गावाजवळील नवीन बांधकाम होत असलेल्या साठवण तलावाच्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता.
आसपासच्या वाड्यांवर बिबट्याने काही पाळीव प्राण्यांवर हल्ले करत त्यांना ठार केले होते, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर आता हा एक बिबट्या जेरबंद झाला आहे. कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर या दोन्ही गावांच्या संयुक्तरित्या साठवण तलावाचे नवीन बांधकाम सुरू असलेल्या परिसरात ऊस, फळबागा आदी पिकांचे क्षेत्र असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा आहे.
त्यामुळे एकदोन महिन्यांपासून बिबट्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात संचार येथे वाढला होता. एकाच महिन्यामध्ये एकाच जागेवर एकापाठोपाठ चार बिबटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. मादी जातीचा अडीच वर्षे वयाचा पिंजरात अडकलेलया
बिबट्याला माळशेजच्या जंगलात सोडण्यात येणार आहे.