spot_img
ब्रेकिंगअहिल्यानगरमध्ये खळबळ! मतपेट्या आणलेल्या बसमध्ये सापडले नोटांचे बंडल

अहिल्यानगरमध्ये खळबळ! मतपेट्या आणलेल्या बसमध्ये सापडले नोटांचे बंडल

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील कोपरगाव येथील हि घटना असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी बसमध्ये मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे विधानसभा निवडणुकीच्या दिवशी ईव्हीएम मशीनची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस बुकिंग करण्यात आल्या होत्या. याच बसमध्ये सीटच्या खाली नोटांचे बंडल आढळून आले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील हि घटना असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी बसमध्ये मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. कोपरगाव आगाराची बस असून दोन दिवसांपूर्वी हीच बस स्ट्रॉंग रूमपासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन गेली होती त्यानंतर काल याच बसने कोपरगाव- वैजापूर- कोपरगाव अशा फेऱ्या मारल्या आहेत.

दरम्यान काल सायंकाळी कोपरगावहून धामोरीकडे जात असताना विद्यार्थ्याला बसच्या शेवटच्या सीटखाली नोटांचे दोन बंडल सापडले आहेत. एसटी बसच्या सीटखाली ५०० रुपयांच्या नोटांचे दोन बंडल सापडल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल ८६ हजारांची रोख रक्कम सापडल्याने खळबळ एवढी मोठी रक्कम नेमकी कुणाची आणि बसच्या सीटखाली कशी आली? याबाबत पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे. मात्र प्रामाणिकपणा दाखवत विद्यार्थ्यांनी वाहकाकडे सुपूर्द केले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अग्नीतांडव! फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १७ जणांचा मृत्यू; कुठे घडला प्रकार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गुजरात राज्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे....

घरात घुसून महिलेसोबत ‘तसले’ वर्तन; रावसाहेबवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात मद्य सेवन केलेल्या व्यक्तीने महिलेच्या घरात जबरदस्ती...

गावच्या विकासासाठी आमदार काशिनाथ दातेंनी दिला कानमंत्र; काय म्हणाले पहा…

नेप्तीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन अहिल्यानगर | नगर सह्याद्री गावा-गावातील धार्मिक एकात्मता भारतीय संस्कृतीने जोडली गेलेली आहे....

‘पारनेर ग्रामीण पतसंस्थेला ४.४३ कोटींचा नफा’

संस्थापक आ. काशिनाथ दातेंची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पारनेर...