spot_img
अहमदनगर‘साकळाई’ साठी पुन्हा एल्गार! लाभधारक शेतकरी संतप्त, दिला 'हा' इशारा

‘साकळाई’ साठी पुन्हा एल्गार! लाभधारक शेतकरी संतप्त, दिला ‘हा’ इशारा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
साकळाई उपसा सिंचन योजनेचा आराखड्याला आठ दिवसांत अंतिम मंजुरी देऊन निधी वर्ग करण्यात यावा. अन्यथा २५ फेब्रुवारी २०२४ रोजी चिखली टोलनाका येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा साकळाई कृती समितीने दिला होता. याबाबतचे निवेदन कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी यापूर्वीही कृती समितीच्यावतीने वेळोवेळी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यापूर्वी दिलेल्या इशार्‍यामुळे राज्य सरकारच्या पातळीवर साकळाई योजना मंजुरीसाठीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. योजनेसाठी लागणारे पाणी उपलब्धता पत्राचे नाहरकत प्रमाणपत्रासाठीचा प्रस्ताव नाशिक कार्यालयाकडे तत्काळ पाठविण्याची कार्यवाही केली. यापुर्वी साकळाई कृती समितीने १४ फेब्रुवारी रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता.

गेल्या २५-३० वर्षापासून साकळाई उपसा जलसिंचन योजनेचा संघर्ष चालू असून साकळाई योजनेचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. ७९४ कोटींचा आराखडा तयार झाला आहे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपादन मंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर योजनेला मंजुरी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करू असे आश्वासन दिले होते.

आठ दिवसात आराखड्याला मंजुरी देऊन निधी वर्ग करावा अन्यथा लोकशाही मार्गाने २५ फेब्रुवारीला चिखली (कोरेगाव, ता. श्रीगोंदा) येथे सकाळी साडेनऊला नगर रोडवर जुना टोलनायावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. लोकसभा निवडणूक जवळ आली तरी साकळाई योजनेचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने लाभधारक शेतकरी आक्रमक झाले आहेत. निवेदन देताना कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेेंडे, संतोष लगड, नारायण रोडे, रामदाम झेंडे, पुरुषोत्तम लगड, सोमनाथ धाडगे, रोहिदास उदमले, सुदाम रोडे, बापूसाहेब गाडेकर, शिवराम लंके प्रविण झेंडे आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....

‘हुजूर मराठे आ रहे हे’! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला मुंबईकडे कूच करणार

बीड । नगर सहयाद्री  येत्या 29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसऱ्या दिवशी...

…हेच माझे राजकारणातील ‘गुरु’!, माजी खासदार सुजय विखे पाटलांचे वक्तव्य चर्चेत

अहिल्यानगर । नगर सहयाद्री गुरुपौर्णिमेनिमित्त माजी खासदार व भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शिर्डी...

नगर शहरातील मावा कारखान्यांवर रेड; पोलीस धडकताच घडलं असं काही..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शुक्रवार दि. 11 जुलै शहरातील नीलक्रांती चौक आणि दिल्लीगेट परिसरात...