spot_img
अहमदनगरमाझ्या नेत्याला मंत्रीपद द्यावं...; आमदार शेळकेंचे एकविरा देवीकडे साकडे, आमदार लंकेंबद्दल नेमकं...

माझ्या नेत्याला मंत्रीपद द्यावं…; आमदार शेळकेंचे एकविरा देवीकडे साकडे, आमदार लंकेंबद्दल नेमकं काय म्हणाले…

spot_img

मुंबईतील पारनेरकर महिलांची एकविरा देवी यात्रा

पारनेर | नगर सह्याद्री

आमचा नेता राज्यभरातील गोरगरीब जनतेसाठी काम करतो आहे. मेहनत घेतोय, परिवाराचा विचार न करता तुमच्या सुखा दुःखात उभा राहतोय. आई एकविरा देवीने माझ्या नेत्याला मंत्रीपद द्यावं. नेते मंत्री झाले म्हणजे मी मंत्री झालो. लंके यांनी उलटे काही बोलयचे नाही. आमची मैत्री आहे. लंके नसल्यावर त्या खुर्चीवर मीच बसणार आहे. हा जनतेचा सेवक आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने निश्चित मंत्री होईल असा विश्वास मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.

नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठाण मुुंबई व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईमधील पारनेरकर महिलांसाठी कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून एकविरा देवी दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेळके यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आ. शेळके म्हणाले, निःस्वार्थी भावनेने, निःस्वार्थी मनाने काम करणारा नेता तुम्हाला लाभलांय. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याच कुटूंबातील सदस्यांप्रमाणे नेत्यांना तुम्ही जपलं आहे. विश्वासाने मोठे केले आहे. तेवढयाच तन मन धनाने काम करणारा आमचा सहकारी आहे.

कोव्हीडचा काळ आठवला तर महाराष्ट्राच एकटयाच माणसाचं नाव घेतलं जातं. जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारण्यात आले आहे. जरांगे पाटील जे सांगतील ते ऐकण्याचे आम्ही ठरवलं आहे. जोपर्यंत मराठा समाज आणि सरकार यांच्यात समन्वय होत नाही, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सर्व कार्यक्रम आणि दौरे रद्द ठेवायचे असेही ठरविण्यात आले आहे. आरक्षणाचा निर्णय होेत नाही तोपर्यंत सरकारला हिवाळी अधिवेशन चालवू देणार नाही. आ. लंके यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.

१० हजार महिलांचा सहभाग
नोंदणी झाल्याप्रमाणे दहा हजार महिला या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. कामोठे, करंजळे, खांदा कॉलनी, नवी मुंबई, घनसोली, ऐरोली, कोरखैरणे, घाटकोपर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, ठाणे, कल्याण, डोंबिवली, कांदीवली, उल्हासनगर, भिवंडी, भांडूप, मानखुर्द, कुलाबा या भागातील महिलांचा त्यात समावेश होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...