spot_img
राजकारणअपात्रतेचा निकाल येण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंचे मोठे पाऊल ! केले 'असे' काही

अपात्रतेचा निकाल येण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंचे मोठे पाऊल ! केले ‘असे’ काही

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : या महिन्याच्या अखेरीस विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्र प्रकरणावर निकाल येऊ शकतो असे सांगितले जात आहे.

त्यामुळे हा निर्णय काय येतो याकडे लक्ष लागले असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुढचे पाऊल टाकले आहे. शिंदे यांनी शिवसेनेचे राज्यातील संपर्क नेते आणि लोकसभा निरीक्षक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

शिंदे यांनी कोकण पट्टा, पश्चिम महाराष्ट्र वगळून उर्वरित ११ क्षेत्रांसाठी लोकसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यानुसार राजेश पाटील – नंदुरबार, प्रसाद ढोमसे – धुळे, सुनील चौधरी – जळगाव, विजय देशमुख – रावेर, अशोक शिंदे – बुलढाणा, भूपेंद्र कवळी – अकोला, मनोज हिरवे – अमरावती, परमेश्वर कदम – वर्धा, अरुण जगताप – रामटेक, अनिल पडवळ – नागपूर, आशिष देसाई – भंडारा-गोंदिया यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

तर पश्चिम महाराष्ट्र सोडून कोकण पट्ट्यासह उर्वरित महाराष्ट्रासाठी विभागीय संपर्क नेत्यांचीही निय़ुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभाग रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यांसाठी उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभाग ठाणे, पालघरसाठी नरेश म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई विभाग मुंबई शहर, मुंबई उपनगरसाठी सिद्धेश कदम, किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर मराठवाडा विभाग नांदेड, लातूर, हिंगोली, धाराशिवसाठी आनंदराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाडा विभाग जालना, संभाजीनगर, परभणी, बीडसाठी अर्जुन खोतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र विभाग नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर जिल्ह्यांसाठी भाऊसाहेब चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी : तनपुरे, वर्पे यांच्या पाठोपाठ लंके यांचा ईव्हिएम पडताळणीसाठी अर्ज, केली ‘ही’ मागणी

१८ बुथवरील मतांची पडताळणी करण्याची मागणी ८ लाख ४९ हजार ६०० रूपये शुल्क जमा पारनेर /...

बच्चू कडू यांच्याबद्दल विखे पाटीलांचे मोठे विधान

राहाता / नगर सह्याद्री - Radhakrishn Vikhe Patil | Bachchu Kadu : महाराष्ट्रात महायुतीच्या...

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? दिग्गज नेत्यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा झटका बसला....

आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जाऊ नका!; पक्ष सोडण्याची भाषा करणाऱ्यांना राठोड यांचा टोला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिक हे एकनिष्ठ आहेत. कोणीही तुटणार...