spot_img
देशमोठी बातमी : राजपूत करणी सेना अध्यक्षची गोळी झाडून हत्या

मोठी बातमी : राजपूत करणी सेना अध्यक्षची गोळी झाडून हत्या

spot_img

नगर सहयाद्री / जयपूर
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या केल्याचे वृत्त आले आहे.

राजस्थान जयपूरमध्ये श्याम नगरमध्ये ही घटना घडली. आरोपींनी सुखदेव सिंह यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकावरही गोळ्या झाडल्या आहेत. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

डॉक्टरांनी तपासल्यानंतर सुखदेव सिंह गोगामेडी यांना मृत घोषित केले. दरम्यान गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. प्राथमिक माहितीनुसार, सुखदेव सिंह गोगामेडी आपल्या निवासस्थानी होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला.

अज्ज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. लॉरेस विश्नोई गँगच्या संपत नेहराकडून सुखदेव सिंह यांना आधी धमकी मिळाली होती, असं बोललं जात आहे.

धमकी मिळाल्यानंतर सुखदेव यांनी जयपूर पोलीस ठाण्यात लिखितमध्ये तक्रार नोंदवली होती. आरोपींनी सुखदेव यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महायुती सरकारचा धडाकेबाज निर्णय; गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवणार

मुंबई। नगर सहयाद्री:- महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेतले आहे. साच एक...

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! २१०० रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे....

आयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा…

मनोज कोतकर | मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहरात भटया...

कापडबाजारातील अतिक्रमण हटवा; अहिल्यानगर हिंदू समाज आक्रमक, दिला ‘हा’ इशारा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - कापड बाजार, घास गल्ली, मोची गल्लीतील अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी...