spot_img
ब्रेकिंगManoj Jarange Patil News :मनोज जरांगेंची इडी चौकशी करा कुणी केली मागणी?...

Manoj Jarange Patil News :मनोज जरांगेंची इडी चौकशी करा कुणी केली मागणी? वाचा सविस्तर..

spot_img

जालना | नगर सह्याद्री:-
राज्यामध्ये मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. एकीकडे ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील अंतरवाली येथे उपोषणाला बसले असतानाच या मागणीला विरोध करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उपोषण सुरु केले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता मनोज जरांगेंची ईडी चौकशी करा, असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ओबीसींची भाषा कधी येत नाही, ओबीसींच्या प्रश्नावर आम्ही वास्तव प्रश्न विचारले होते. मुख्यमंत्र्यांना धनगरांच्या एसटी आरक्षणाबद्दल जीआर काढण्याचा अधिकार नाही, हा अधिकार संसदेचा आहे. मुख्यमंत्री घटनेशी द्रोह करत आहेत. मुख्यमंत्री तुम्ही म्हणता ओबीसी आरक्षण धक्का लागत नाही जरांगे म्हणतात आम्ही आरक्षण घेतलंय, नक्की कोण खरं बोलत आहे, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरेंसह जे आमच्या आरक्षणाबद्दल बोलले नाहीत, त्यांना आम्ही बॉयकॉट करणार आहोत. ओबीसी फक्त ओबीसींना मतदान करणार आहेत. जरांगे यांना रात्री पवार फॅमिली येऊन भेटते. ज्या देवेंद्र फडणवीस सारख्या माणसाने सारथीला निधी निर्माण करून दिला ते सगळी माणस आज देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने शिव्या घालतात. ओबीसींच्या बाजूने भूमिका न घेणार्‍यांच्या सोबत कधीही सामील होणार नाही, आम्ही या निवडणुकीत पाडणार आहे सुरवात घनसांवगी पासून करणार आहे, असं लक्ष्मण हाके म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...