spot_img
अहमदनगरAhmadnagar Politics: खासदार विखेंच्या प्रचार सभेत पंकजा मुंडेंची भावनिक साद! म्हणाल्या, मुंडेची...

Ahmadnagar Politics: खासदार विखेंच्या प्रचार सभेत पंकजा मुंडेंची भावनिक साद! म्हणाल्या, मुंडेची लेक..

spot_img

पाथर्डी । नगर सहयाद्री-
गोपीनाथ मुंडेची लेक एका तरूण मराठा भावाला विजयी करण्यासाठी आली असल्याची भावनिक साद पंकजा मुंडे यांनी घातली. सुजय विखे पाटील यांना विजयी करण्यासाठी एक एक मत महत्वाचे असल्‍याचे प्रतिपादन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. पाथर्डी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पाथर्डी येथील बाजार तळ मैदान येथे महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, अशोक चोरमले, बापूसाहेब भोसले, मृत्यूंजय गर्जे, तुषार वैद्य, राहुल राजळे, काशिनाथ लवांडे, देविदास खेडकर, बाळासाहेब दराडे, भगवान बांगर, अंकुश चितळे, अशोक अहुजा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

त्यांनी सांगितले की, डॉ. सुजय विखे यांनी आपल्या पहिल्याच खासदारकीच्या काळात विविध विकासकामे करत आपली चुनक दाखवली आहे. यामुळे येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास करण्याची त्यांना दुसऱ्यांचा संधी देण्याची आपली जबाबदारी आहे. यामुळे एक एक मत महत्वाचे असून त्या मतामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाची धुरा सांभाळणार आहेत. यामुळे येत्या १३ मे रोजी कमळाचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी. जिल्हापरिषद अध्यक्षा शालिनीताई यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, खा. डॉ.सुजय विखे यांना करोनामुळे कमी कार्यकाल मिळाला पण त्यातही त्यांनी जिल्ह्यात ४ औद्योगिक वसाहती आणल्या. यामुळे जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच काम मिळणार आहे.

तर शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या भाषणात खा. डॉ. सुजय विखे यांच्या कार्याचा गौरव केला. तर आमदार मोनिकाताई यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडून त्यांचे समाधान सोडविण्यासाठी सुजय विखे हेच पर्याय असल्याचे सांगितले. तर खासदार धैर्यशील माने यांनी संसदेतील सुजय विखे यांच्या कामाचा गौरव करत मोदींच्या टीम मध्ये डॉ. सुजय विखे यांना पाठविण्याचे आवाहन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...