spot_img
अहमदनगरखा. डॉ. विखेंच्या पाठिंब्यावर औटी समर्थकांचा बुधवारी मेळावा'

खा. डॉ. विखेंच्या पाठिंब्यावर औटी समर्थकांचा बुधवारी मेळावा’

spot_img

औटी यांच्या भाषणानाकडे तालुक्याचे लक्ष
टाकळी ढोकेश्वर | नगर सह्याद्री
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, माजी आमदार विजय औटी यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर पाठिंब्याविषयी सविस्तर भुमिका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात औटी हे मांडणार आहेत. पारनेर शहरातील मनकर्णिका सभागृहात बुधवार (ता.८) रोजी सकाळी १० वाजता औटी समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहीती रामदास भोसले, शंकर नगरे, निलेश खोडदे, सुरेश बोरुडे, सुभाष ठाणगे, शुभम देशमुख, जयसिंग धोत्रे, पंढरीनाथ उंडे, नवनाथ सोबले, बाबासाहेब न-हे, कांतीलाल ठाणगे, सुनिता मुळे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत पारनेर-नगर मतदारसंघात माजी आमदार विजय औटी यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. सलग पंधरा वर्षे त्यांनी पारनेर नगर मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. कार्यकर्त्यांचा संच मोठा आहे. जिल्ह्यातील अभ्यासु नेते अशी त्यांची ओळख आहे. मतदारसंघ फेररचनेत त्यांनी अभ्यासपूर्ण बाजु मांडली होती. दिनांक १ मे रोजी त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांनी सविस्तर भुमिका मांडली नव्हती.

याकरता औटी समर्थकांनी तालुयातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असुन त्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. या मेळाव्यात खासदार सुजय विखे यांना का पाठिंबा देण्यात आला याविषयी व तालुयातील इतर राजकीय परिस्थितीतीवर माजी आमदार औटी बोलणार आहेत. ते काय बोलता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...